- जुन्या वादातून रचला कट
- १८ जणांनी केला होता प्रणघातक हल्ला
- उपचारादरम्यान जीम ट्रेनरने घेतला शेवटचा श्वास
Bhusawal Crime : शहरातील खडका रोड परिसरात जून्या वादाच्या कारणावरुन एकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती. या घटनेत जखमी जीम ट्रेनरचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर खडकारोड परीसरात (Bhusawal News) तणावाचे वातावरण असून परस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
याबाबत पोलाससांकडून मिळालेली माहीता अशी की, जून्या वादाच्या कारणावरुन शहरातील खडका रोड परिसरातील हीरा हॉलजवळ अफाक अख्तर पटेल यास रोमान शेख शकील शेख, तेहरीन नासीर शेख, शेख समीर शेख फिरोज आणि लतीफ तडवी यांनी रॉड आणि लाठयांनी मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच इसम दानिश शेख फरीद शेख, शेख उबेद शेख अक्रम, मुजम्मिल शेख फरीद, तोहिद शेख नासीर शेख, अबुजर शेख बशीर मुस्तफा शाह युनुस शाह, नासीर सन्नाटा, बिलाल बागवान, शेख हमजा शेख रफीक, इम्मु कोलरीया, कल्लू तडवी व अक्रम शेख सबदर शेख, कलीम उंद्री व शरीफ उंद्री यांनी मारहाण करणाऱ्याना मदत करत या कटात शामिल झाले होते. या मारहाणीत अफाक अख्तर पटेल याचे दोन्ही हात व डावा पाय फ्रक्चर होत तो गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी अफाक अख्तर पटेल याच्या फिर्यादीवरुण मारहाण व या कटात सामिल असलेल्या १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गंभीर जखमी अफाक अख्तर पटेल याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना दि ८ रोजी त्याची प्रोणज्यात मालवली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून खडका रोड भागात परीस्थिती तणावपुर्ण आहे. या ठीकाणी तगडा बंदोबस्त असून पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे.