शिवसेना सोशल मीडियाच्या शिलेदारांच्या प्रमुख पदांवर नियुक्त्या
मुक्ताईनगर येथे राजेश ढोले (इच्छापूर निमखेडी) यांची “शिवसेना सोशल मीडिया उपजिल्हा संघटक” आणि चंद्रकांत उर्फ पप्पू मराठे (मुक्ताईनगर) यांची “शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख” पदी निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल शिवसेना पक्षाने त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
या प्रसंगी चंद्रकांत पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटू भोई, शिवसेना अल्पसंख्याक महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष अफसर खान, शिवसेना तालुकाप्रमुख नवनीत पाटील, शिवसेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख शिवराज पाटील, शिवाजी पाटील, गणेश थेटे, नगरसेवक आरिफ आझाद आदी मान्यवर उपस्थित होते.
वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या सूचनेनुसार आणि सोशल मीडिया राज्य प्रमुख राहुल कनाल यांच्या मान्यतेने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. उत्तर महाराष्ट्र प्रमुख मयूर मगर, शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर तसेच शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियुक्तीपत्र शिवराज पाटील यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले.
हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा ज्वलंत हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना पक्षवाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करावे, अशा शुभेच्छा सर्व मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना दिल्या.