Shivasena News: निवडणूक आयोगाकडे सुरू असलेल्या उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या राजकीय संघर्षावर मोठा ऐतेहासिक निर्णय दिलेला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल लागलेला असून आता शिवसेना नाव व धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाकडे मिळाले असून हा निर्णय जाहीर होताच संत मुक्ताईनगर येथे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांना प्रवर्तन चौकात जमून एकच जल्लोष केला प्रसंगी फटाक्यांची आतिषबाजी व dj च्या तालावर शिवसेना गीताच्या चालीवर प्रचंड जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी नगरसेवक गटनेता राजेंद्र हिवराळे, संतोष मराठे, युनूस खान , आरिफ आझाद, वसंत भलभले , सुनील पाटील , छोटू भोई, अफसर खान, गोपाळ सोनवणे, अमरदीप पाटील, दिलीप पाटील , प्रकाश गोसावी, किरण कोळी, अशोक कुंभार , मुकेश माळी, शिवराज पाटील, प्रवीण भोई, योगेश पाटील, विजय मराठे, शुभम शर्मा, मजीद खान, सलीम खान , संतोष माळी, गणेश टोंगे, मनोज मराठे, आकाश भोई, पवन भोई, संदीप पाटील, अर्जुन भोई आदींसह असंख्य शिवसैनिक बांधव उपस्थित होते.