Thursday, July 3, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

अखेर आज ! शिवसेना आमदार अपात्रतेचा महानिकाल, विधानसभा अध्यक्षांकडे सर्वांचे लक्ष

Admin by Admin
January 10, 2024
in मुक्ताई वार्ता
0
अखेर आज ! शिवसेना आमदार अपात्रतेचा महानिकाल, विधानसभा अध्यक्षांकडे सर्वांचे लक्ष
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अखेर आज ! शिवसेना आमदार अपात्रतेचा महानिकाल, विधानसभा अध्यक्षांकडे सर्वांचे लक्ष

महाराष्ट्राराज्यासह संपूर्ण देशभराचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना शिंदे व उभाठा गटाच्या आमदार अपात्रतेचा (Shiv Sena MLA Disqualification Case) निकाल आज दि.10 जानेवारी 2024 रोजी सायं.4 वाजेच्या सुमारास सुनावण्यात येणार आहे. परंतु निकालाच्या पूर्व संध्येलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांच्या भेटी वर उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेत पत्रकार परिषदेत गंभीर आरोप करून निकालापूर्वीच निकालावर शंका उपस्थित करून ठाकरे गटाची हार होत असल्याचे दर्शवून दिलेले आहे.

Maharashtra विधिमंडळ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Ad.Rahul Narwekar) हे आज दि.10 जानेवारी 2024 रोजी सायं 4 वाजे दरम्यान निकाल जाहीर करतील असे अपेक्षित आहे. दरम्यान,जवळपास दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेल्या चमत्कारिक रित्या पडलेल्या फुटीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.

शिवसेना ठाकरे गटाकडून व्हीप आदेश मोडल्याप्रकरणी तत्कालीन गटनेता, आमदार तथा विद्यमान  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CMO Eknath Shinde) यांच्यासह सुमारे 16 आमदारांवर अपात्रतेची याचिका दाखल केलेली होती. दरम्यान दुसरीकडे निवडणूक आयोगाकडे दाखल दुसऱ्या याचिकेत शिवसेना ही शिंदे गटाची सिद्ध होत एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना नाव व पक्ष चिन्ह गेल्याने सुप्रीम कोर्टात देखील जवळपास वर्षभराच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने विचित्र निकाल देत आपल्या निकालात काही गोष्टी स्पष्ट करत विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेचा सुनावणी घेऊन निकाल देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर, आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल सुनावणार आहेत.

 विधानसभा अध्यक्षांसमोर चालली तीन महिने सुनावणी

विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणी अखेर तीन महिन्यानंतर पूर्ण झाली. दोन्ही गटातील बाजूंचा युक्तिवाद, याचिका एकत्रित करणे, त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांच्या आमदारांची उलट तपासणी घेऊन साक्ष नोंदवणे आणि अंतिम सुनावणीतील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद असं करत ही सुनावणी तीन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यात आली.

या साक्ष उलटतपासणी दरम्यान ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची महतत्वपूर्ण साक्ष नोंदवण्यात आली होती. शिंदे गटाचे वकील Ad. महेश जेठमलानी यांनी प्रभू यांनी व्हीप बजावलाच नाही, सगळा बोगस कारभार असल्याचे सिद्ध करण्याचे प्रयत्न केले होते.

सुनील प्रभू यांच्या उलट तपासणीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि खासदारांच्या उलट तपासणीला सुरुवात करताना प्रश्नांचा भडीमार केलेला होता. शिवसेना शिंदे गटाने महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा डाव आखला होता आणि हा एक नियोजित राजकीय कट होता हे रेकॉर्डवर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तशा प्रकारची प्रश्न शिंदे गटाच्या आमदार खासदारांना उलट तपासणी केली होती.

आमदार अपात्रता प्रकरणी निकालात हे असू शकतात महत्त्वपूर्ण ठळक मुद्दे- 

– निकालात एकूण 34 याचिकांचे 6 गटात समावेश करून ही सुनावणीची प्रक्रिया पार पडली. त्यानुसार, सहा गटांत निकाल वाचला जावू शकतो.

– सुमारे 200 पानांचा एक निकाल असून सहा गटांचा मिळून सुमारे 1200 पानांचे निकाल पत्र तयार करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

– परिणामी, सहा गटांतील निकालाचा सारांश केवळ वाचला जाईल. याउलट संपूर्ण निकालाची प्रत ही दोन्ही गटांना पाठवली जाण्याची शक्यता आहे.

– पक्षांतर बंदी कायद्याची स्पष्टता आणि नेमकी व्याख्या या प्रकरणाच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

– सर्वोच्च न्यायालयाच्या या प्रकरणातील मर्यादा आधीच स्पष्ट झालेल्या आहेत त्या निकालानंतर अधिकृत रित्या स्पष्ट होतील.

– अशा प्रकरणांमधील विधानसभा अध्यक्षांची कार्यकक्षा आणि अधिकार ही स्पष्ट होतील.

– राजकीय पक्ष व विधीमंडळ पक्ष यांच्या कार्यकक्षा देखील या निकालानंतर स्पष्ट होतील.

अपात्रतेची टांगती तलवार असणारे दोन्ही गटातील आमदार

शिवसेना शिंदे गट 16 आमदार

1) एकनाथ शिंदे Eknath Shinde
2) अब्दुल सत्तार Abdul Sattar
3) चिमणराव पाटील Chimanrav patil
4) तानाजी सावंत Tanaji Savant
5) संदीपान भुमरे Sandipan Bhumare
6) यामिनी जाधव yamini Jadhav
7) भरत गोगावले Bharat Gogavale
8) संजय शिरसाठ Sanjay Shirasat
9) प्रकाश सुर्वे Prakash Surve
10)  लता सोनवणे Lata Sonavane
11) बालाजी किणीकर Balaji Kinikar
12) महेश शिंदे Mahesh Shinde
13) अनिल बाबर Anil Babar
14) संजय रायमूळकर Sanjay Raymulakar
15) रमेश बोरनारे Ramesh Boranare
16)  बालाजी कल्याणकर Balaji kalyanakar

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार

1) अजय चौधरी Ajay Chaudhary
2) सुनिल प्रभू Sunil Prabhu
3) राजन साळवी Rajan Salavi
4) भास्कर जाधव Bhaskar Jadhav
5) कैलास पाटील Kailas Patil
6) सुनिल राऊत Sunil Raut
7)  रवींद्र वायकर Ravindra Vaykar
8)  वैभव नाईक Vaibhav Naik
9) राहुल पाटील Rahul Patil
10) प्रकाश फातर्फेकर Prakash Fakartekar
11) नितीन देशमुख Nitin Deshmukh
12) संजय पोतनीस Sanjay Potanis
13) उदयसिंह राजपूत Udaysinh Rajput
14)  रमेश कोरगावंकर Ramesh Korgavkar

Tags: all eyes on Assembly SpeakerCM Ekanath ShindeEkanath shindeFinally today! Shiv Sena MLA disqualificationLatest Marathi NewsRahul NarvekarShivasenaUddhav Thackarayअखेर आज ! शिवसेना आमदार अपात्रतेचा महानिकालउध्दव ठाकरेएकनाथ शिंदेराहुल नार्वेकरविधानसभा अध्यक्षांकडे सर्वांचे लक्ष
Previous Post

To H.B.P.Ravindra Harne Maharaj Consecration of Prabhu Shri Ram Mandir Invitation to the ceremony..

Next Post

Aid announced for damages in November 2023 – MLA. Chandrakant Patil

Admin

Admin

Next Post
Aid announced for damages in November 2023 – MLA. Chandrakant Patil

Aid announced for damages in November 2023 - MLA. Chandrakant Patil

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group