Shah Rukh Khan OTT Movie : शाहरुख खानने (Shahrukh Khan) तो बॉलिवूडचा बादशाह असल्याचे पुन्हा सिद्ध केले आहे. त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘पठाण’ (Pathaan) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कड कमाईसह रेकॉर्ड बनवला आहे. शाहरुखच्या ‘पठाण’ला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. पण, ‘पठाण’ व्यतिरिक्त शाहरुख खानने ‘स्वदेस’ ते ‘फॅन’मध्ये जबरदस्त काम केले. तरी या सिनेमांना ‘पठाण’ सारखे यश मिळाले नाही मात्र, शाहरुख खानचे हे सिनेमे OTT प्लॅटफॉर्मवर हीट ठरले आहे.
फॅन
या क्राइम फिक्शन चित्रपटात एका वेडसर चाहत्याची कहाणी दाखवण्यात आली आहे. समीक्षकांना हा चित्रपट खूप आवडला आणि त्यासोबतच शाहरुखच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले. मात्र, त्यानंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. शाहरुखचे चाहते त्याचा चित्रपट प्राइम व्हिडिओवर पाहू शकतात.
स्वदेस
आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘स्वदेस’ चित्रपटात एका अनिवासी भारतीयाची गोष्ट दाखवण्यात आली आहे, जो आपल्या आईला अमेरिकेत घेऊन जाण्यासाठी येतो. मात्र, आपल्या गावाची स्थिती पाहून तो आपल्या कर्तृत्वाने त्या गावातील लाईटची समस्या दूर करतो. यानंतर देशाचे प्रेम त्याला परत बोलावते. चित्रपटाचा विषय आश्चर्यकारक असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारच फ्लॉप झाला.तुम्हाला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट बघता येईल.
पहेली
Netflix वर उपलब्ध असलेला, शाहरुख खानचा हा चित्रपट अधिकृतपणे ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवण्यात आला होता. या चित्रपटात विवाहित महिलेवर भूताचे आकर्षण दाखवण्यात आले आहे. अमोल पालेकर यांनी या उत्तम चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, मात्र एवढे होऊनही हा चित्रपट मोठ्या पडद्यावर फ्लॉप ठरला.