ऐतेहासिक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वज पूजनाने,संत मुक्ताई यात्रोत्सवाची सुरूवात !
Sant Muktai Yatra festival started with historic flag worship by Chief Minister!

तिर्थक्षेत्र श्रीक्षेत्र संत मुक्ताईनगर येथे आदिशक्ती श्री संत मुक्ताई यांचा दि.४ मार्च ते १० मार्च असा माघावारी अष्टमी ते महाशिवरात्री पर्वावर चालणाऱ्या भव्य यात्रोत्सवाची लोकप्रीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde)यांच्या शुभ हस्ते ध्वज पूजनाने सुरुवात झालेली असून आ.चंद्रकांत पाटील(Mla chandrakant Patil)यांनी मंजूर केलेल्या सुलवाडी ते मुंढोळदे (खडकाचे) पुलासह विविध ८०० कोटींच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते “साधला पर्वकाळ” या उक्तीप्रमाणे ध्वज पूजन करून यात्रोत्सवाची सुरूवात झाल्याने वारकरी भाविकांसाठी हा क्षण ऐतेहासिक ठरलेला असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात झालेला पहिला यात्रोत्सव म्हणून याची नोंद झालेली आहे.
प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ.चंद्रकांत पाटील,आ.किशोर अप्पा पाटील, आ.चिमणराव पाटील, संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड रविंद्र भैय्यासाहेब पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रविंद्र हरणे महाराज, संत मुक्ताई (sant muktai)जूने मंदिर व्यवस्थापक उद्धव जुनारे महाराज, पुरुषोत्तम वंजारी, संग्राम पाटील, ज्ञानेश्वर हरणे आदींसह असंख्य वारकरी व भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.




