राणे कुटुंबीयांकडून संत मुक्ताई महाप्रसादाची पूर्वतयारी सुरु — शेतातच घेतला गावरान भाजीपाला भरघोस उत्पादन !
श्रीक्षेत्र मुक्ताईनगर , ता. २५ जुलै २०२५ —
श्री. संत मुक्ताई आषाढी पालखी सोहळ्याचे श्रीक्षेत्र पंढरपूरहून ३० जुलै रोजी श्रीक्षेत्र कोथळी (ता. मुक्ताईनगर) येथे आगमन होणार आहे. या पालखीच्या स्वागतासाठी संपूर्ण श्रीक्षेत्र मुक्ताईनगर शहर सज्ज झाले असून, नवीन संत मुक्ताई मंदिर ते पुरातन संत मुक्ताई मंदिर श्रीक्षेत्र कोथळीपर्यंत भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या मिरवणुकीदरम्यान वारकऱ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे. हजारो भक्त आणि वारकरी यावेळी उपस्थित राहणार असल्याने महाप्रसादासाठी विविध साहित्याची पूर्वतयारी जोमाने सुरू आहे. पंचक्रोशीतील गावांमधून भक्तीने पोळ्या जमा होत आहेत, तर शिरा आणि भाजीसाठी स्थानिक दानशूर नागरिकांकडून सहकार्य मिळत आहे.
महाप्रसादात अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला भाजीपाला यावेळी कोणत्याही टंचाईशिवाय उपलब्ध झाला आहे. मागील वर्षी लसणाची टंचाई जाणवत होती आणि स्वयंपाकासाठी मोठ्या प्रमाणावर धावपळ झाली होती. यावर्षी ही अडचण टाळण्यासाठी राणे कुटुंबीयांनी पुढाकार घेत स्वतःच्या शेतातच गावरान भाजीपाला उत्पादन घेतले. मुक्ताई माऊलीच्या कृपेने भरघोस उत्पन्न मिळाल्याने सध्या महाप्रसादासाठी भाजीपाला निवडण्याचे काम सुरु आहे.
राणे कुटुंबीयांचा हा भक्तिभाव, सेवा आणि दूरदृष्टी खरंच वाखाणण्याजोगी आहे. भाजीपाला पण महत्त्वाच्या गोष्टीची योजना आधीपासून करून त्यांनी श्री. संत मुक्ताई पालखी सोहळ्यातील महत्त्वाचा
🔸या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी ३० जुलै रोजी श्रीक्षेत्र कोथळी येथे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
— मुक्ताई वार्ता ✍️