नाशिक, 10 मार्च (हिं.स.) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२८ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने फुले स्मारक मुंबई नाका येथे माजी खासदार तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष समीर भुजबळ यांनी महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.
मुंबई नाका येथील महात्मा फुले स्मारकात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.