पुणे, 7 मार्च (हिं.स.)।
सिंहगड रस्ता परिसरात पुन्हा एकदा गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये सध्या तिघांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. त्यामध्ये दूषित पाण्यामुळे जीबीएस झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने पाणी पुरवठा विभागाला पत्र लिहून या भागातील पाण्याची तपासणी करावी आणि शुद्ध पाणी पुरवठा करावे अशी सूचना केली आहे.
पुण्यात गेल्या तीन महिन्यापासून जीबीएसचे रुग्ण आढळत आहेत. यामध्ये विशेषतः धायरी, नऱ्हे, खडकवासला, नांदेड, सणसवाडी, किरकटवाडी या भागाचा समावेश आहे. जीबीएसच्या आजारामुळे काही रुग्णांचा मृत्यूही झाला असून, तर अनेकांवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
त्यांना चालणे, हाताची हालचाल करणेही अवघड होत आहे. या उपचारावर लाखो रुपयांचा खर्च रुग्णांच्या नातेवाइकांना करावा लागत आहे. त्यामुळे जीबीएसच्या आजाराबाबत नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
—————