अमरावती, 9 मार्च (हिं.स.)
रहिवासी प्रयोजनाच्या अम्युनिटीमध्ये अवैद्य सुरू असलेला ढाबा कारवाईच्या चक्रव्यूहात अडकला असताना गावातील इतर अधिकृत ढावा व खाद्यपदाथांच्या दुकान मालकांनी फोस्टॅकच्या प्रमाणपत्रासाठी नोंदणी करणे सुरू केलेले आहे.
सदर ढाबा मालकाने स्थानिक स्वराज्य संस्था व अन्नसुरक्षा पर्यवेक्षक प्रशिक्षणाची देखील परवानगी घेतली नाही. भारत सरकारच्या २००६ च्या कलम १६ (३) एच कायद्यानुसार आता प्रत्येक अन्न व्यापारी यांना अन्न सुरक्षा पर्यवेक्षक प्रशिक्षण घेणे आवश्यक झाल्याने सदर प्रशिक्षण घेण्यासाठी गावात अनालयटिकेल टेस्टिंग रिसर्च लॅबोरेटरी आणि भारत सरकारच्या फोस्टेकच्या माध्यमाने तालुका व जिल्हा समन्वयक व्यक्ती माहिती देण्यासाठी येथील व्यावसायिकांकडे आले होते.
त्यांनी स्वतःच्या व्यवसायाची त्या समन्वयक जवळ सहाशे ‘ रुपये शुल्क भरून नोंदणी करून घेतली आहे. आता लंबेकरच त्यांना या व्यवसावासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. ज्यामध्ये सदर प्रशिक्षणात दुकानांमध्ये साफसफाई कशाप्रकारे करावी, खाद्यपदार्थावर येणारी बुरशी कीटक कसे रोखावे, दुकानात औषधी फवारणी, अन्नधान्य साठवण करताना काय काळजी घ्यावी. याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
त्यानंतर त्यांना अन्नसुरक्षा पर्यवेक्षक प्रमाणपत्र सुद्धा प्रदान करण्यात येणार आहे. तर प्रशिक्षण न घेणाऱ्या अन्न व्यापाऱ्यांची जुन्या लायसनचे नूतनीकरण केले जाणार नसल्याचेही यावेळी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गावात नियमबाह्य सुरू असलेल्या ढाबा मालकाने स्वतः जवळ अन्नसुरक्षेचे प्रमाणपत्र असल्याचा दावा केला असला तरी अन्नसुरक्षा पर्यवेक्षक प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर केलेले नाही. अशावेळी शासकीय नियमानुसार त्याच्या जवळचा परवाना रद्द करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.
ग्रामपंचायतची एनओसी न घेता सुरू केलेल्या ढाबा मालकाला आम्ही नोटीस देऊन तीन दिवसात व्यवसाय बंद करण्यात यावा अशाप्रकारे सुचित केले आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
पुरुषोत्तम कोकाटे, ग्रामपंचायत अधिकारी, पथ्रोट