अमरावती, 27 मार्च (हिं.स.)।
नवसारी, लालखडी, तारखेडा, साईनगर पार्वतीनगर, आकोली, चमनगर या परिसरातील नागरिकासाठी १६० कोटी रुपयांचा पर्यायी मार्ग मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आ. रवि राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले असून आकोली चमनगर वळण रस्ता पूर्ण होणार आहे.
आ. आकोली चमनगर वळण रस्ता चे पुढील काम पूर्णकरण्यासाठी मुख्यमंत्रीयांचे कडे पाठपुरावा करत होते. २५ मार्च रोजी नगर विकास मंत्रालयाने शासन निर्णय काढला आहे. अमरावती शहरातील नगर चमनगर येथील झोपडपट्टीधारकांना मनपा भूखंड देणे बाबत शासन निर्णय झाला. आ. रवी राणा हे ४६ सातत्याने आकोली वळण रस्ता पूर्ण व्हावा यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करत होते.
अमरावती शहर विकास योजनेमधील 60 मीटर अकोली रस्त्याने बाधित होणाऱ्या चमन नगर येथील झोपडपट्टीधारकांना पर्याय भूखंड भाडेपट्ट्याने देणेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या आदेशान्वये नगर विकास विभागाने शासन निर्णय क्रमांक 24 पत्र क्रमांक 154 नवीन 26 दिनांक 25 मधून रोज 25 रोजी निर्गमित केला. या निर्णयामुळे आता आकोलीवळणरस्ता पूर्ण होणार आहे. लालखडी, नवसारी, तारखेडा, चमननगर, आकोली, सांईनगर, पार्वतीनगर, या परिसरातील लोकांना वरील रस्ता पर्यायी मार्ग म्हणून सोय होणार आहे.
—————