Rakhi Sawant: मनोरंजन विश्वातली वादग्रस्त तसेच कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे राखी सावंत (Rakhi Sawant). राखी सध्या खूप अडचणीतून जात असून नुकतेच तिच्या आईचे निधन झाले आहे. आईच्या निधनानंतर राखी आता आदिलमुळे (Adil Khan) परेशान आहे. राखी सावंतने नुकताच मीडियासमोर खुलासा केला की, तिचे लग्न धोक्यात आले असून तिला तिचे लग्न वाचवायचे आहे. तसेच लग्न म्हणजे विनोद नाही, असंही ती म्हणाली. दरम्यान. राखीचा एक व्हिडिओ समोर आला असून ती रडताना दिसत आहे.
राखी-आदिलचे आठ महिन्यांपूर्वी लग्न
दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत असताना 29 जानेवारीला राखीच्या आईचे निधन झाले. तर आठ महिन्यांपूर्वी राखीने म्हैसूरचे बिझनेसमन आदिल खान दुर्रानीसोबत लग्न केलं, पण हे लग्न गुपित ठेवण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी राखीने तिच्या लग्नाचा खुलासा केला. त्यानंतर आदिलनेही राखीशी लग्न केल्याचे मान्य केले. आदिलसोबत लग्न करण्यासाठी राखीने धर्मही बदलला होता.
राखीने दिली आदिलला धमकी
View this post on Instagram
मनोरंजन विश्वातील ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमी प्रमाणे पुन्हा चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती आपण तणावात असल्याचे सांगत आहे आणि त्यामुळेच ती जिममध्ये आली आहे. राखीने आदिलच्या एक्स गर्लफ्रेंडला मीडियाच्या माध्यमातून धमकी देत, ‘ मी दीड महीना बिग बॉस मराठीमध्ये असताना मी खूप फायदा उचलला, माझ्याकडे फोटो आणि व्हिडिओ सगळं असून ते दाखवणार…, आदिल, म्हणूनच का तू आठ महीने आपलं लग्न लपवून ठेवलं. तुझं अफेअर व्हावेत म्हणून का? राखी पुढे म्हणाली, ‘मला बायको, मुलांची आई व्हायचं आहे’.