अहिल्यानगर दि. 9 मार्च (हिं.स.) :- श्री राधाकृष्णा मंदिराच्या उभारणीमुळे परिसरातील नागरिकांसाठी एक आध्यात्मिक केंद्र उपलब्ध होणार आहे, या ठिकाणी मोठ्या उसाहत धार्मिक कार्यक्रम सप्पन्न होतील. तसेच आपल्याला लाभलेल्या अध्यात्मिकचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी मदत होईल. श्री राधाकृष्णा मंदिरातील धार्मिक कार्यक्रमा तून अध्यात्मिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल, प्रभागातील सर्वांगीण विकासाच्या कामाबरोबरच अध्यात्मि क कामाला जोड दिली असल्याचे प्रतिपादन माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी केले.
तपोवन रोड भिस्तबाग महाल जवळ श्री राधाकृष्ण मंदिराचे भूमिपूजन मनपा माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ह.भ.प संदीप महाराज खोसे,माजी नगरसेविका मीना चव्हाण आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ह.भ.प संदीप महाराज खोसे म्हणाले की आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोबाईलचा अतिवापर होत असून,समाजामध्ये अध्यात्मिक तेची गोडी निर्माण होण्यासाठी, धार्मिक स्थळे उभे राहणे गरजेचे आहे. तपोवन रोड येथील राधाकृष्ण नगर येथे राधाकृष्ण मंदिराची उभारणी होत असून अध्यात्मिकतेचे केंद्र बनेल, श्री राधाकृष्ण मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा शुभारंभ मोठ्या भक्ती भावाने आणि उत्साहात पार पडला. या पवित्र कार्यासाठी विधिवत पूजाअर्चा आणि मंत्र उच्चाराद्वारे भूमिपूजन संपन्न झाले आहे. मंदिराच्या माध्यमातून नागरिक एकत्र येत आपल्या विचाराची देवाण घेवाण करतील असे ते म्हणाले.