पुणे, 13 मार्च (हिं.स.)
पुणे शहरामध्ये सर्वधर्मीय धार्मिक स्थळांवर १८३० भोंगे असल्याची नोंद पोलिस प्रशासनाकडे आहे. या भोंग्यांचं सर्वेक्षण होणार असून अनधिकृत भोंग्यांची माहिती घेण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी ठाण्यांना दिलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आदेशाचं पालन करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या धार्मिक स्थळांवर असलेल्या भोंग्याबाबत ध्वनी प्रदूषण मर्यादित ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाचे पालन करण्याचे आदेश दिले आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार दिवसा 55 डेसिबल तर, संध्याकाळी 45 डेसिबल आवाजाची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. त्यासोबत या आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी पुण्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांची बैठक घेतली.