गोंदिया, 1 मार्च,
कधी कधी पाळीवपाणी देखील माणसापेक्षा जास्त आपल्या मालकांना प्रेम करतात. आणि वेळ आली की आपल्या जीवाची बाजी लावून आपल्या मालकांच्या जीव वाचवतात. अशीच पाळीव प्राण्याच्या निष्ठेचा प्रत्यय देणारी घटना बोलूंदा येथे घडली.
अंगणात उभ्या असलेल्या मालकावर अचानक अस्वलाने हल्ला चढवला. हा संघर्ष सुरू असताना, मालकाने मदतीसाठी आक्रोश केला. त्याच क्षणी त्यांचा पाळीव कुत्रा अस्वलावर तुटून पडला. अस्वलाच्या तावडीतून मालकाची सुटका करण्यासाठी कुत्र्याने आक्रमकपणे प्रतिकार केला. अखेर अस्वलाने माघार घेतली आणि जंगलाच्या दिशेने पळ काढला.