Pathaan Box Office Collection: ‘पठाण’ (Pathaan Movie) चित्रपटाच्या निमित्ताने 4 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर बॉलिवूडचा (Bollywood News) बादशाह मेगा सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) मोठ्या पडद्यावर परतला आहे. सध्या थिएटर्सपासून बॉक्स ऑफिसपर्यंत ‘पठाण’ची चांगलीच घोडदौड सुरू आहे. विशेष म्हणजे दररोज ‘पठाण’च्या कलेक्शनमध्ये वाढ होत आहे. अशात रिलीजच्या 11व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या शनिवारी ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. जाणून घेऊया शनिवारी पठाणने किती कोटींची कमाई केली.
शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रेक्षकांचा प्रतिाद मिळत असल्याने ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवरही (Pathaan Box Office Collection) धमाकेदार व्यवसाय करत पुढे जात आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी 55 कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई करणारा ‘पठाण’ची रिलीज होऊन 11 दिवशीही घोडदौड कायम आहे. चित्रपट समीक्षकांच्या मते, ‘पठाण’ने शनिवारी बॉक्स ऑफिसवर (Pathaan Box Office Collection) 22.50 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे ‘पठाण’च्या एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शनने 400 कोटींच्यावर कमाई केली आहे.
View this post on Instagram
पठाणने शुक्रवारी 13 कोटींचे कलेक्शन केले होते. तर शनिवारी ‘पठाण’च्या कलेक्शनमध्ये लक्षणीय (Pathaan Box Office Collection) वाढ झाली. यासोबतच या दुसऱ्या एक्स्टेंडेड वीकेंडला ‘पठाण’ 425 कोटींहून अधिक कलेक्शन करेल अशी शक्याता आहे.
दरम्यान, या चित्रपटाच्यानिमित्ताने बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानने तब्बल ४ वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. रिलीज होण्या आधीच हा चित्रपट चर्चेत आला होता.