सोलापूर, 7 मार्च (हिं.स.)।कारमधून १४७ किलो गांजासह ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई भटुंबरे (ता. पंढरपूर) परिसरातील अहिल्यादेवी चौकात करण्यात आली. याप्रकरणी माळशिरस तालुक्यातील तिघांविरोधात पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गुरसाळेकडून (ता. पंढरपूर) पंढरपूरच्या दिशेने येणाऱ्या एका कारमध्ये गांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अहिल्यादेवी चौकात नाकाबंदी केली. नाकाबंदी कारवाईवेळी गुरसाळेतून अहिल्यादेवी चौकात एक संशयित कार पोलिसांनी अडवली.
वाहनाच्या तपासणीप्रसंगी त्या वाहनातील प्रदीप दत्तात्रय हिवरे (वय २०, रा. पुरंदावडे, ता. माळशिरस) याच्याकडे विचारपूस केली. या कारमध्ये आंबट उग्र वासाचा तीन पोती गांजा ७२ पाकिटांमध्ये पॅक करण्यात आलेला १४७ किलो ग्रॅम वजनाचा गांजा व कार (एमएच १२- एचव्ही ५६६६) असा एकूण ४० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.