अहिल्यानगर दि. 31 मार्च (हिं.स.) :- जिंदगी मिलेंगी फिर से दोबारा शॉर्ट फिल्म अवयवदान जागृतीला देणार नवा प्रकाश,असे प्रतिपादन फेडरेशन ऑफ मेडिकल रिप्रेझेंटेटि व्ह असोसिएशन ऑफ इंडिया (एफएमआरआय) चे संस्थापक डॉ. पुरुषोत्तम पवार यांनी केले.
द फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲण्ड बॉडी डोनेशन अहिल्यानगर शाखा व फेडरेशन ऑफ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडिया (एफएमआरआय) यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रदान अवयदान व देहदान या चळवळी ला गती देण्यासाठी जनजागृतीवर जिंदगी मिलेगी फिर से दोबारा या लघुपटाचे सादरीकरण करण्यात आले.
शहरा तील डॉक्टर, केमिस्ट बांधव, विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी या शॉर्ट फिल्मचा आनंद घेऊन टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. तर गरजूंना नवजीवन देणाऱ्या अवयवदान चळवळीला अधिक गती देण्याचा संकल्प व्यक्त केला. दीपक पापडेजा कृत-लघुपट प्रीमियर नगरकरांसाठी कल्याण रोड येथील आयएमए हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.