अहिल्यानगर, 03 मार्च (हिं.स.) :- शिवसेना प्रमुख बाळा साहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन समाजाप्रती बांधिलकी जोपासत विकासाच्या योजना यशस्वीपणे राबवल्या जात आहे.शिवसेना पक्षच जनतेचे प्रश्न सोडवू शकतो.शिवसैनिक हा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचलेला आहे.समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याचे काम शिवसेनाच करत आहे.उप मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शहरातील विकास कामांसाठी मोठा निधी मिळाला आहे.प्रभाग १२ मधील ४ ही नगरसेवकांनी विकासाच्या योजना यशस्वीपणे राबविले असून नागरिकांना विश्वासात घेऊन नियोजनबद्ध व कायम स्वरूपी कामे मार्गी लावली असल्यामुळे आता ती पुन्हा-पुन्हा करण्याची गरज भासणार नाही.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पिंपळगाव माळवी येथील महापालिकेच्या जागेवर पर्यटन स्थळ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन संभाजी कदम यांनी केले. प्रभाग क्रमांक 12 मधील नंदनवन कॉलनी येथे रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ डॉ.रंगनाथ सांगळे यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी माजी महापौर सुरेखा कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी नगरसेवक दत्ता कावरे, परेश लोखंडे, रवींद्र कटारिया, मयूर बोरा, दिलीप मुनोत, मदनलाल कोठारी, दत्तात्रय चौधरी, अलका चौधरी, विद्या मडके, अनुराधा पवार, लक्ष्मी बोरा, दादासाहेब मडके, डॉ.अमेय सांगळे आदी उपस्थित होते.
बाळासाहेब बोराटे म्हणाले की नगरसेवक पदाच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन केले असल्यामुळेच प्रभागातील नागरिकां नी ४ ही नगरसेवक शिवसेनेचे निवडून दिले.त्या माध्यमातून प्रभागातील बहुतांश विकासाची कामे मार्गी लावली आहे. नागरिकांच्या सुखदुःखामध्ये सामील होत मूलभूत प्रश्न तातडीने सोडविण्याचे काम केले जाते असे ते म्हणाले.डॉ. रंगनाथ सांगळे म्हणाले की नंदनवन कॉलनी ही सुसंस्कृत म्हणून नावारूपाला आली आहे. येथील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम नगरसेवकांनी केले आहे. चांगले काम करणाऱ्याच्या पाठीमागे जनता उभी राहत असते असे ते म्हणाले.——————-