🕊️ श्रद्धांजली संदेश – वसंतराव कडू पाटील 🕊️
स्व. वसंतराव कडू पाटील यांचे दुःखद निधन
मुक्ताईनगर:
मुक्ताईनगर येथील “श्री कॉलनी”, हनुमान मंदिर जवळचे रहिवासी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (J.D.C.C.) सेवा निवृत्त कर्मचारी स्व. वसंतराव कडू पाटील यांचे अल्पशा आजाराने दिनांक २३ जुलै २०२५ बुधवार रोजी दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनाने मुक्ताईनगर परिसरात शोककळा पसरली आहे. शांत, सौम्य व प्रेमळ स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित होते.
स्व. वसंतराव पाटील हे श्री. शिवाजी पाटील व श्री. अश्विन उर्फ तानाजी पाटील यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा बुधवार, दिनांक २३ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता राहते घर “श्री कॉलनी”, हनुमान मंदिराजवळ, मुक्ताईनगर येथून निघून भुसावळ रोडवरील कोथळी स्मशानभूमीकडे नेण्यात येणार आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व शोकाकुल परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐
🙏 श्रद्धांजली अर्पण 🙏
(हि निधन वार्ता “मुक्ताई वार्ता” तर्फे प्रसिद्ध)