निधन वार्ता : कै.राहुल विलास जैसवाल यांचे दु:खद निधन
मुक्ताईनगर येथील राहणार श्री. विलास रमेशलाल जैसवाल (एस.टी. कंडक्टर व गुरुकृपा हॉटेलचे मालक) यांचे पुत्र कै. राहुल विलास जैसवाल यांचे काल रात्री १९ मे २०२५ रोजी मलकापूरहून मुक्ताईनगर कडे परत येताना झालेल्या दुर्दैवी अपघातात निधन झाले. ही घटना सर्वांनाच हळहळ वाटणारी आहे.
दिवसेंदिवस प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करणाऱ्या राहुल यांच्या अकस्मात निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार होता.
अंत्ययात्रा
आज दि. २० मे २०२५, मंगळवार रोजी सकाळी ११:०० वाजता
त्यांचे राहते घर – आदर्श स्कूल रोड, सिंचन ऑफिस जवळून
अंत्ययात्रा निघणार आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली..!
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, आणि परिवारास हे दु:ख सहन करण्याची ताकद देवो, हीच प्रार्थना.