News : श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा !
पहा सोहळ्यात काय काय घडलं ?
जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती !
देह कष्ट्विती, परोपकारे !!
तसेच भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.’ या आधारवड वचनाने अनेकांना, भव तापात, दुःखातून तसेच अनेक कठीण प्रसंगातूनही भव तारणारे श्री.स्वामी समर्थ महाराजांचा आज ६ मे २०२४ रोजी पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सदरील सोहळा अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित, तिर्थक्षेत्र मुक्ताईनगर जि.जळगाव येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालविकास संस्कार केंद्राच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.
पुण्यतिथी सोहळा अशा प्रकारे झाला साजरा
दि.३० एप्रिल २०२४ ते ६ मे २०२४ या सप्ताह काळात श्री.गुरू चरित्र सामूहिक पारायण व अखंड नाम जप यज्ञ सेवा पार पडली.
शहरातील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे व चंद्रकांत दादा यांच्या आदेशाने अखंड स्वामीनाम जप यज्ञ सप्ताह व सामूहिक श्री.गुरुचरित्र पारायण तसेच सोबत नवनाथ पारायण, श्रीमद् भागवत पारायण, श्रीपाद पारायण , प्रहरी सेवेत अखंड स्वामीनाम जप, अखंड दोन विना वादन, अखंड दोन स्वामी चरित्र पठण आणि यासह गणेश याग, मनोबोध याग, गीताई याग, चंडी याग, स्वामी याग, रुद्र याग, मल्हारी याग, तसेच रोज नित्यस्वहाकार सेवेसह मांदियाळी महाप्रसाद घेवून सोमवारी दि.६ मे रोजी सोहळ्याची सांगता झाली.
तसेच सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात येवून
प्रत्येक सेवेकऱ्याला आपला काही वेळ स्वामींसाठी, त्यांच्या भक्तीत लीन होण्यात समाधान मिळते. या भक्तिमय भावनेतून हजारो सेवेकरी व भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
प्रत्येक सेवेकरी माता, भगिनी,पुरुष बांधव आणि युवा वर्ग यांचा उत्साह होता..
व्हिडिओ बातमी पहा मुक्ताई वार्ता युट्यूब चॅनल वर