नवी दिल्ली, २१ मार्च (हिं.स.) : वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आणि भारतीय हवामान खात्याने (IMD) विविध प्रदेशांना दिलेल्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर, आयुष मंत्रालयाने देशभर पसरलेल्या आपल्या संस्थांच्या जाळ्यामार्फत देशव्यापी जागरूकता मोहीम सुरू केली आहे.
उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालकां अंतर्गत सार्वजनिक आरोग्य सल्लागारांच्या सूचना
हायड्रेटेड रहा : तुमचे शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण राखण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या. द्रवपदार्थांची पातळी राखण्यासाठी आणि शरीर थंड राखण्यासाठी तुम्ही ताक, नारळ पाणी आणि फळांचे रसांचा वापर करू शकता.
शीतल पेयांचा वापर : तुमच्या दिनचर्येत नैसर्गिकरित्या थंड पेये समाविष्ट करा, जसे की नारळ पाणी, लिंबाचा रस किंवा फळांपासून बनवलेली पेये. हे शरीराचे तापमान कमी करण्यास आणि तुम्हाला ताजेतवाने ठेवण्यास मदत करतात.
थेट उन्हात जाणे टाळा : बाहेर जाताना उन्हाची तिव्रता कमी करण्यासाठी छत्री वापरा किंवा रुंद काठाची टोपी घाला. यामुळे उष्माघात आणि उन्हाचा ताप टाळण्यास मदत होते.
पचायला हलके पदार्थ खा : घराबाहेर पडण्यापूर्वी हलके, पचण्यास सोपे जेवण करा. जड किंवा तेलकट पदार्थ खाणे टाळा, कारण ते शरीराची उष्णता वाढवू शकतात.
योग्य कपडे वापरा : सुती कापडापासून बनवलेले पूर्ण बाह्यांचे, सैलसर कपडे घाला. हे कपडे थेट सूर्यप्रकाशापासून योग्य संरक्षण करतात आणि तुमचे शरीर थंड ठेवण्यास मदत करतात.
थंडावा देणाऱ्या पदार्थांचा वापर : खस (वेटिव्हर), जिरे आणि धणे यासारखे थंडावा देणारे घटक पिण्याच्या पाण्यात टाकून ते पाणी प्या. यामुळे शरीराची उष्णता कमी होण्यास मदत होऊ शकते.