नाशिक, 4 मार्च (हिं.स.)।
– संतोष देखमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याला फाशीची शिक्षा देण्यासाठी व समाजवादी पार्टीचे प्रमुख आबू आझमी यांच्या विरोधात शिवसेना नाशिकच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देखमुख यांच्या हत्या प्रकरणी काल सि.आय.डी. च्या वतीने आरोपपत्र दाखल करण्यात आले, या आरोपपत्रात व्हिडीओ किल्प व फोटो दाखल करण्यात असून अनेक माध्यमांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसमोर आले. महाराष्ट्रात एखाद्या खंडणी मागण्यासाठी व दहशत निर्माण करण्यासाठी एका सरपंचाची अशी निर्घुण हत्या होणार असेल तर अश्या सर्व आरोपींना ताबडतोब फाशी झालीच पाहिजे. महाराष्ट्रातील कायदा सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी व अश्या विकृतींचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे व प्रमुख आरोपी वाल्मिक कराड सह त्यांच्या सर्व साथीदारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या नाशिक महानगराच्या वतीने शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, मायको सर्कल येथे निषेध आंदोलन करण्यात आले.
तसेच समाजवादी पार्टीचे प्रमुख आबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून औरंगजेब यांच्याबद्दल कौतुकास्पद केलेले उदगार यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे आबू आझमी यांच्या फोटोला चपला मारून निषेध आंदोलन करण्यात आले, या प्रसंगी शिवसेना उपनेते, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, भाऊलाल तांबडे, अनिल ढिकले, सुदाम डेमसे, शामकुमार साबळे, शिवाजी भोर, दिगंबर मोगरे, प्रमोद लासुरे, अमोल सूर्यवंशी, विधानसभा प्रमुख रोषण शिंदें, जिवन दिघोळे, मंगलाताई भास्कर, अस्मिता देशमाने, मंदाकिनी जाधव, ज्योतीताई फड, सुनिताताई जाधव, उपमहानगर प्रमुख आनंद फरताळे, उमेश चव्हाण, कैलास जाधव, कल्पेश कांडेकर, लकी ढोकणे, युवासेना जिल्हाप्रमुख रुपेश पालकर, आकाश कोकाटे, अमोल रायते, आकाश पवार, गौरव पगारे, प्रसाद जोशी, तुषार गिरी आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.