Murabba in Winter : मुरंबा (Muramba) आवडत नाहा असा व्यक्ती शोधणे कठीण आहे. प्रत्येकाला मुरंबा चवीला स्वादिष्ट तसेच आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. आयुर्वेदानुसार, मुरांब्याचे (Benefits of Marmalade) अनेक आरोग्यदायी फायदे आहे. मुरंबा साखरेऐवजी गुळ वापरून तयार केल्यास त्याचा अधिक लाभ होतो. फायबर समृद्ध फळांमुळे मुरंबा खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी ठरतो. हिवाळ्यात रोज मुरंबा खाल्ल्याने उच्च कोलेस्ट्रॉल (blood sugar and cholesterol), रक्तदाब आणि पचनक्रियेशी संबंधित समस्या देखील दूर होते. प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी देखील मुरंबा फायदेशीर ठरतो. हिवाळ्यात शरिरात उब निर्माण होईल अशा पदार्थांच्या सेवनाचा सल्ला आरोग्यतज्ञ नेहमी देतात. गुळाचा गुणधर्म हा गरम असून जेव्हा तो फळांच्या रसात मिसळतो तेव्हा त्याचे औषधी गुणधर्मही वाढतात.
मुरांबा खाण्याचे फायदे
आवळ्याचा मुरंबा
आवळा हे असे फळ आहे. जे अनेक औषधी गुणधर्माने संपन्न आहे. त्याू आवळ्याचा मुरंबा आरोग्यासाठी एक प्रकारे संजीवणी ठरतो. आवळा मुरंबामध्ये जीवनसत्त्वे, क्रोमियम, जस्त आणि तांबे चांगल्या प्रमाणात असतात. यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. रोगप्रतिकारशक्ती मजबूत होत पचनक्रिया सुधारण्यास देखील आवळ मुरंबा फायदेशीर ठरतो. त्वचा विकारात देखील आवळा मुरंबा प्रभावी ठरतो. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि पिंपल्स दूर होतात.
गाजर मुरंबा
गाजराचा मुरंबा खाल्ल्याने शरीराला मुबलक प्रमाणात उर्जा मिळते. तसेच यामध्ये व्हिटॅमिन ए असते ज्यामुळे दृष्टी वाढण्यास मदत होते. यासोबतच या मुरंबामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्समुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित समस्यां टाळता येते. यासह शरीरातील हिमोग्लोबिनची पातळीही योग्य राहते. यासोबतच पोटाची जळजळ आणि भूक न लागण्याची समस्याही दूर होते.
बेलाचा मुरंबा
व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फायबर, प्रथिने आणि लोह यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असा बेलाच्या मुरंबा आरोग्याला खूप लाभदायक ठरतो. हा मुरंबा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच पचनसंस्थाही निरोगी राहते. त्यामुळे अपचन, बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. यासह बेलचा मुरंबा खाल्ल्याने मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि वजन कमी होण्यास मदत होते.
सफरचंदाचा मुरंबा
सफरचंदच हे असं फळ आहे जे खाण्याचा सल्ला प्रत्येक आहारतज्ज्ञ देतो. सफरचंदमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स आणि फायबर यांसारखे पोषकतत्व मुबलक प्रमाणात आहे. सफरचंदाचा मुरंबा आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. याचा आहारात समावेश केल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. सफरचंदाचा मुरंबा निद्रानाश, डोकेदुखी आणि विस्मरण यापासूनही आराम देतो. तसेच, मानसिक तणाव, केसगळती आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यातही मदत करतो. सफरचंदाचा मुरंबा खाल्ल्याने रक्तदाब आणि रक्तातील साखरही नियंत्रणात राहते आणि पचनक्रियाही चांगली राहते.
(टीप : हा लेख सामान्य माहितीवर आधारीत असून muktaivarta.com याचे समर्थन करत नाही. कोणताही उपाय करून पाहण्याआधी तुम्ही वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा)