मुक्ताईनगरमध्ये दिवंगत शेतकरी कुटुंबांना “संवेदन किट” चे वाटप
मुक्ताईनगर तालुक्यात नापिकी आणि कर्जामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना महाराष्ट्र राज्य मुंबई कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित, विभागीय कार्यालय, जळगाव यांच्यातर्फे सुमारे ४ हजार रुपये किमतीचे “संवेदन किट” मोफत देण्यात आले. या किटमध्ये बी-बियाणे, कीटकनाशके आणि फवारण्यांचा समावेश असून, यामुळे त्यांना पुढील शेतीच्या कामात मोठा आधार मिळेल.
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या कुमारी संजानाताई पाटील आणि सुपुत्र हर्षराज पाटील यांच्या हस्ते या किटचे वाटप करण्यात आले.
या किटचे वाटप करण्यात आलेल्या दिवंगत शेतकऱ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
* तरोडे येथील विनोद छबीलदास पाटील
* बोरखेडा येथील अंबादास जनार्दन जवरे
* मुक्ताईनगर येथील महेंद्र दिलीप कोळी
* निमखेडी येथील लक्ष्मण रघुनाथ धनगर
* निमखेडी येथील अनंता रामचंद्र चोपडे
* धामणगाव येथील यशवंत ज्ञानेश्वर बागल
* रिंगाव येथील सुरेश ओंकार विटे
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटू भोई, युवासेना जिल्हा प्रमुख पंकज राणे, शिवसेना शहर प्रमुख प्रशांत टोंगे, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, शहर संघटक वसंत भलभले, गणेश घाईट पाटील, गौरव दुट्टे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच, कृषी उद्योग विकास महामंडळातर्फे जिल्हा प्रतिनिधी योगेश रतीराम पाटील आणि तालुका कृषी विभागाचे कृषी सहाय्यक अधिकारी संदीप पाटील यांचीही यावेळी उपस्थिती होती.