Muktainagar News: मंत्रालयातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुक्ताईनगर तालुक्याच्या दृष्टीने एक मोठा निर्णय आज मंत्रालयात घेण्यात आला. या निर्णयाने तालुक्यातील बेरोजगार तसेच शेतकरी वर्गाची दशा बदलणार आहे. जाणून घेऊया नेमकं काय निर्णय झाला मंत्रालयात..
राज्यात सत्ता बदलानंतर शिंदे फडणवीस सरकार ( CM Shinde Government) स्थापन होतात मुक्ताईनगर येथे 625 एकर जमीन क्षेत्रफळावर एमआयडीसी (Muktainagar MIDC) औद्योगिक उभारणीसाठी मंजुरी मिळाली होती. या प्रक्रियेला प्रशासकीय स्तरावर वेगवान गती मिळालेली असून बुधवारी दिनांक 8 फेब्रुवारी रोजी मंत्रालयातील उद्योग मंत्र्यांच्या दालनात औद्योगिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत उद्योग मंत्री व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत 625 एकर पैकी 100 एकर जमिनीचे क्षेत्रफळ सुरुवातीला संपादीत करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असून उर्वरित क्षेत्र उद्योग व्यवसायाच्या आवश्यकतेनुसार संपादित केले जाईल अशी माहिती बैठकीत अधिकाऱ्यांतर्फे देण्यात आली असून मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात शंभर एकर जमीन तातडीने संपादीत करण्याच्या सूचना केलेल्या आहेत यामुळे मुक्ताईनगर मतदारसंघासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वप्न असलेले एमआयडीसी स्थापन होण्याच्या प्रक्रियेला आता हिरवी झेंडी मिळालेली असून आमदार चंद्रकांत पाटील यांचा एमआयडीसी संदर्भात सुरू असलेला पाठपुरावा ही आज मतदार संघासाठी खूप मोठी उपलब्ध ठरलेली आहे त्यामुळे मतदार संघातील नागरिकांतर्फे त्यांच्या कर्तृत्वशील व कणखर बाण्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रसंगी बैठकीत उद्योग मंत्री उदय सामंत , आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह औद्योगिक वसाहत महामंडळाचे जॉइंट सी ई ओ रंगा नाईक, जॉइंट सी ई ओ मलिक नेर, मंत्रालयातील उद्योग विभागाचे श्री देवागावकर, उपसचिव किरण जाधव ,औद्योगिक वसाहत महामंडळाचे विभागीय अधिकारी श्री गावित आदींची उपस्थिती होती.