नाशिक, 12 एप्रिल (हिं.स.)।
महाराष्ट्रात एवढ्या शेतकरी आत्महत्या करत आहेत. किसान आंदोलनात ८०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. लोकसभा संपल्यानंतर दोन दिवसांनी चालाक सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवले. मणिपूरला अजून पंतप्रधान जात नाही , फक्त पुष्टीकरण आणि ध्रुवीकरण याच्यावर लक्ष केंद्रेकरन करत आहेत. जुन्या गोष्टी विनाकारण उकरून काढत असल्याची टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी केली.
परशुराम सायखेडकर नाट्यगृहात भगवान महावीर जन्मकल्याण सोहळ्यानिमित्त तीन दिवसीय व्याख्यानमालेत दुसरे पुष्प खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकशाहीची सद्यस्थिती या विषयावर गुंफले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, शेतकऱ्यांना अजून अतिदृष्टीचे तसेच पी एम किसान विम्याचे पैसे मिळाले नाही.
ईव्हीएम बद्दल आमची तक्रार आहेच , अजूनही इलेक्शन कमिशन वोटर लिस्ट द्यायला तयार नाही. साम-दाम-दंड सर्व काही सत्ताधाऱ्यांनी लोकसभेत वापरले. चार महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत फारसे काही चित्र बदलणारे नव्हते असे मतही खा. प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले.