MLAChandrakantPatil :अपघातग्रस्तांना स्वत:च्या गाडीतून हॉस्पिटलला नेले, मुक्ताईनगरचे आमदाराकडून माणुसकीचं दर्शन !
संत मुक्ताईनगर : इंदौर- छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मार्गावर निमखेडी खू गावाजवळ असलेल्या नर्सरी जवळील परिसरात दोघे दुचाकी स्वारांचे दुचाकीवरचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यात दोघे दुचाकी वरील चार ही जण जखमी झाले. दरम्यान रस्त्याने मुक्ताईनगर येथील आमदार चंद्रकांत पाटील यांना दिसले. आमदार पाटील यांनी लागलीच वाहन थांबवले. जखमींजवळ जात विचारपूस केली. तसेच जखमींना आपल्या वाहनात नेऊन स्वतः रुग्णालयात दाखल करत माणुसकीचा परिचय दिला.
आमदार चंद्रकांत पाटील यांना जखमी दिसताच त्यांनी आपल्या वाहनाने मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी झालेल्या महिलेचे जुबेरा बी शे.अब्दुल रहेमान रा. बडजिरी असून त्या त्यांचे पती सह बडजिरी येथून बुऱ्हाणपूर कडे मुक्ताईनगर मार्गे जात होत्या. तर इतर सर्व किरकोळ जखमींवर देखील प्राथमिक करण्यात आले. घटनेची माहिती आमदारांनी रुग्णाच्या नातेवाईकांना भ्रमणध्वनी वरून दिली.
रस्त्यावर अनेक अपघात होतात, मात्र सर्वच जण मदतीसाठी पुढे सरसावतातच असे नाही. पोलिसांचा ससेमीरा मागे लागू रूग्णालय येथे ये म्हणून अनेकजण मदत करणंही टाळतात. मात्र, आमदार चंद्रकांत पाटील यांनी अपघातग्रस्तांना मदत करुन, लोकांनी अशावेळी मदत करायला पुढे यावे, असाही संदेश दिला आहे.