औरंगजेबाची कबर हटवण्यासाठीच्या आंदोलनाला सुरुवातपुणे, 17 मार्च (हिं.स.)।विश्व हिंदू परिषदेने शिवजयंतीच्या निमित्ताने आजपासून औरंगजेबाची कबर हटवण्यासाठीच्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील काही नेतेमंडळींनीही तशा प्रकारची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे तेलंगणातील आमदार टी. राजा यांनी पुण्यात बोलताना औरंगजेबाच्या कबरीसंदर्भात विधान केलं आहे.
भारत हिंदू राष्ट्र बनवण्याचा आपला संकल्प असल्याचं सांगतानाच टी. राजा यांनी यावेळी औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत भूमिका मांडली आहे. “औरंगजेबाची कबर राज्यातून हटवण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्रातील हिंदू करत आहेत. कधी हटणार औरंगजेबाची कबर? माझा आता एकच संकल्प आहे, भारत हिंदू राष्ट्र बनवणं आणि औरंगजेबाची कबर इथून हटवणं”, असं टी राजा यावेळी म्हणाले. फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील हिंदूंचा हाच प्रश्न आहे, असाही दावा राजा यांनी केला आहे