Okआ.चंद्रकांत पाटलांची अधिवेशनात डरकाळी,
अन् शेतकऱ्यांच्या खात्यात रखडलेली विम्याची रक्कम वर्ग !
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दि.१९ डिसेंबर २०२३ रोजी औचित्याच्या मुद्द्याने हवामान आधारित केळी पिक विम्याच्या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली व या पीक विमा कंपनीद्वारा कुत्रिम अडचणी उभ्या करून कशा प्रकारे शेतकऱ्यांना अडचणीत आणून नुकसान भरपाईची रक्कम अडविली याबद्दल जाब विचारताच अवघ्या काही तासात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात दुसरा हप्ता पडल्याच्या पोष्ट करून स्वतः शेतकरी आमदाराचे अधिवेशनातील व्हायरल बातमी वर पोष्ट करून आ.चंद्रकांत पाटील यांचे आभार मानताना दिसून आले.
याबाबत आ.पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही काही शेतकरी बांधवांनी लागलीच पिक विम्याचा हप्ता खात्यावर आल्याचे सांगितले. आणि ज्या शेतकरी बांधवांचे सटेलाईट व इतर तांत्रिक अडचणीमुळे विमा अवैध झाला आहे अशा सर्व शेतकरी बांधवांना पण शासनाकडे पाठपुरावा करून दिलासा देणार असल्याचे आ. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
अधिवेशनात मुद्दा ठरणार शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा –
ज्यांचा पिक विमा कंपनीने नाकारलेला होता त्यांना लाभ मिळण्याचा मार्ग सुकर होताना दिसून येत असून ज्यांना या अडचणी आल्या आहेत त्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष कृषी व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी जाऊन पंचनामे करणार आहेत व ज्यांची खरेच केळी होती त्यांना पंचनाम्याच्या अहवालानुसार नुकसान भरपाई मिळण्याची चिन्हे सुकर झालेली असल्याचे आ.पाटील यांनी मांडलेल्या अधिवेशनातील औचित्याच्या मुद्यावरून दिसून येत आहे.