“खरीप हंगामची जय्यत तयारी सुरू! मुक्ताईनगरमध्ये शेतकऱ्यांसाठी भव्य कार्यशाळा – आ.चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपाययोजनांचा सखोल आढावा”
मुक्ताईनगर | प्रतिनिधी
आज दिनांक ८ मे २०२५ गुरुवारी, खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळा व आढावा बैठक मुक्ताईनगर येथे आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना, शेतकऱ्यांना मार्गदर्शन, योजना माहिती व पूरक व्यवसायांची दिशा देण्याचा या बैठकीचा उद्देश होता.
ठळक मुद्दे:
▶ केळी उत्पादनात सुरक्षितता:
आपत्कालीन परिस्थितीत होणारे नुकसान कसे टाळावे यावर तज्ज्ञांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
▶ खत व पावसाळी व्यवस्थापन:
शेती पिकांच्या योग्य खत व्यवस्थापनासह पावसाच्या अनियमिततेत पीक वाचविण्याचे उपाय सुचवले गेले.
▶ पूरक व्यवसाय – पशुसंवर्धन:
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुसंवर्धनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.
कार्यशाळेतील मान्यवरांची उपस्थिती:
या बैठकीस उपविभागीय अधिकारी भुसावळ श्री. जितेंद्र पाटील, मुक्ताईनगर तहसीलदार श्री. गिरीश वखारे, गटविकास अधिकारी सौ. निशा जाधव, तालुका कृषी अधिकारी श्री. शिंदे, नगरपंचायत कर्मचारी वर्ग, तसेच शिवसेनाचे विविध पदाधिकारी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना उपस्थिती विशेष:
- जिल्हाप्रमुख छोटूभाऊ भोई
- तालुकाप्रमुख नवनीत पाटील
- उपतालुकाप्रमुख प्रफुल पाटील
- नगरसेवक राजेंद्र हिवराळे, निलेश शिरसाठ
- शहरप्रमुख गणेश टोंगे व युवासेना कार्यकर्ते
शेतकऱ्यांना दिशा देणारा उपक्रम!
या कार्यशाळेतून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी तयारी कशी करावी, हवामानातील बदलांशी जुळवून घेत पीक वाचवण्याचे उपाय, तसेच आर्थिक स्थैर्यासाठी पूरक व्यवसायांची जोड याबद्दल माहिती मिळाली.
अशा उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करता येईल, असा विश्वास या कार्यशाळेमुळे व्यक्त करण्यात आला.