Men’s Health : अयुर्वेदात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आरोग्याला खूप लाभ होतो. यातील एक म्हणजे भोपळ्याचे बी (Pumpkin). आरोग्यासाठी (Health Tips) भोपळ्याचे बी खूप फायदेशीर ठरते. याच्या सेवनाने आरोग्यासंबंधी (Pumpkin Seed Benefits) अनेक समस्या दूर होतात. पुरूषांसाठी (Men Health) तर ही बी फारच लाभदायी आहे. पुरुषांनी आपल्या आहारात (Men’s Diet) ही बी समाविष्ठ केल्यास अनेक फायदे मिळू शकतात. त्यानुसार जाणून घेवूया भोपळ्याच्या बीचे आरोग्यदायी फायद्यांविषयी.
भोपळ्याच्या बियांचे हे आहे चमत्कारीक फायदे
कॅन्सर
आयुर्वेदानुसार, भोपळ्याच्या बियांमधे असे औषधी घटक आहेत ज्यामुळे प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो. भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर आदी घटक असतात. हे घटक पुरुषांमधील प्रोस्टेट कॅन्सरची समस्या दूर करण्यास मदत करते. यासह आरोग्यााठी भोपळ्याच्या बियांचा अनेक प्रकारे लाभ होतो.
रक्तवाढ
भोपळ्याच्या बिया या ऊर्जेचे उत्तम स्त्रोत आहे. या बिया खाल्ल्याने ऊर्जा मिळते. भोपळ्याच्या बियांमध्ये असे गुणधर्म असतात ज्यामुळे रक्त वाढवण्यास मदत होते. यासह इतर व्याधींना दूर ठेवण्यासाठी शरीराची रोगप्रतिकार शक्तीही वाढवते.
मधुमेह
भोपळ्याच्या बिया या पुरुषांसाठी अनेक प्रकारे रामबाण ठरतात. भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्यास मधुमेह नियंत्रणात येतो. यासह नियमित जर भोपळ्याच्या बियांचे सेवन केले तर मधुमेह आजारापासून स्वतःला दूर ठेवता येते.
वैद्यकीय सल्ला घ्या
पुरुषांच्या आरोग्यासाठी भोपळ्याच्या बियांचे सेवन अत्यंत लाभकारी आहे. मात्र जर तुम्हाला आरोग्याविषयी इतर समस्या असेत तर आपल्या आहारात बदल करण्यापूर्वी आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
(टीप : हा लेख सामान्य माहितीवर आधारीत असून muktaivarta.com याचे समर्थन करत नाही. कोणताही उपाय करून पाहण्याआधी तुम्ही वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा)