अमरावती, 1 एप्रिल (हिं.स.)
आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी ब वर्गाच्या रिक्त असलेल्या २० जागांकरिता कंत्राटी भरती राबविली जात आहेय या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या सभागृहात अर्ज करणाऱ्या ५० उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.
आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी गट-ब कंत्राटी २० पदे तातडीने भरण्याकरीता आरोग्य विभागाकडून मार्च एंडींगमध्ये देखील प्रक्रिया सुरू केली आहे. या जागांकरिता उमेदवारांकडून अर्ज बोलाविले होते. डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात जिल्हा निवड समितीने मान्यता प्रदान केलेल्या सुचिमधील ५० उमेदवारांचे सुटीच्या दिवशी सुध्दा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले यांच्या मार्गदर्शनात उमेदवारांच्या मुळ कागदपत्राची पडताळणी करण्यात आली. त्याप्रमाणे पात्र वैद्यकीय अधिकारी गट-ब कंत्राटी २० पदे ही तातळीने भरण्यात येणार आहेत. सद्या मार्च एन्डींगची लगबग असून सुध्दा पदभरतीची कार्यवाही सुध्दा सुरू आहे. सदर कार्यवाहीस आर. आर. रोघे, निलीमा भांगे, विनोंद बुटे, अरुणा राठोड, प्रमोद वानखडे, दिया गजघाटे यांनी राबविली.