अहिल्यानगर दि. 7 मार्च ( हिं.स.) :- लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने राबवलेल्या विकास योजनांमधून संगमनेर शहर हे वैभवशाली ठरले आहे. संगमनेर शहर हे सामाजिक समतेचा संदेश देणारे असून समता व बंधुता यांचा मंत्र देणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा संगमनेर शहरात पूर्णाकृती पुतळा संगमनेर मधील माळीवाडा येथे एक कोटी रुपयांच्या निधीची मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारकडे केली असून हा पुतळा लवकर उभा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
याबाबत आमदार सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरांमध्ये विकासाच्या अनेक योजना राबवल्या आहेत. विविध अद्यावत प्रशासकीय इमारतींबरोबर बायपास संगमनेर शहरासाठी 24 तास पाणी, गंगामाई घाटाचे सुशोभीकरण, रस्त्यांचे जाळे,विविध गार्डनची निर्मिती, शैक्षणिक सुविधा सामाजिक सलोखा आणि भरलेली बाजारपेठ यामुळे संगमनेर हे वैभवशाली शहर ठरले आहे.लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर मधील हायटेक बसस्थानक समोर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण कृती पुतळा उभारण्यात येणार असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा होणार आहे.
तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येथे भव्य शहीद स्मारक उभारण्यात येणार आहे.महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण आणि समतेचा संदेश जगाला दिला असून 1993 मध्ये डॉ.सुधीर तांबे हे नगराध्यक्ष असताना माळीवाडा येथे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.या दोघांचीही सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान हे पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी असून असून नगरपरिषद हद्दीमधील माळीवाडा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा एकत्रित पूर्णकृती पुतळा उभा करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
यावर राज्या चे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरात लवकर संगमनेर शहरांमध्ये भव्य असा महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांचा एकत्रित पूर्ण कृती पुतळा उभा करण्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपला सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्ण कृती पुतळा शहरात उभा राहण्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल संगमनेर मधील सर्व नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.