Friday, May 9, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

Maharashtra New Chief Minister: एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला, परंतु नरेंद्र मोदी-अमित शाह पुन्हा वापरणार धक्कातंत्र?

Admin by Admin
November 27, 2024
in मुक्ताई वार्ता
0
Maharashtra New Chief Minister: एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला, परंतु नरेंद्र मोदी-अमित शाह पुन्हा वापरणार धक्कातंत्र?
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Maharashtra New Chief Minister: एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला, परंतु नरेंद्र मोदी-अमित शाह पुन्हा वापरणार धक्कातंत्र?
राज्याचे काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला आहे. मात्र, असं असलं तरी शेवटच्या क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे धक्कातंत्राचा वापर करू शकतात.
Maharashtra New Chief Minister
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार?
मोदी-शाह पुन्हा वापरणार धक्कातंत्र?
Maharashtra New Chief Minister
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीसह भाजपला प्रचंड मोठं यश मिळालं. त्यामुळे महाराष्ट्रात आता भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी जोरकसपणे लावून धरण्यात आली होती. पण हा विजय एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात मिळाला आहे त्यामुळे त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी त्यांच्या पक्षाकडून सुरू होती. त्यामुळेच मागील तीन दिवसांपासून मुख्यमंत्री पदाबाबत खल सुरू होता. अखेर आज (27 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला आहे.
Maharashtra New Chief Minister
मात्र, असं असलं तरी मुख्यमंत्री पदाचा अंतिम निर्णय हा नरेंद्र मोदी-अमित शाह हेच घेणार आहेत.
मोदी-शाह पुन्हा वापरणार का धक्कातंत्र?
Maharashtra New Chief Minister
महाराष्ट्राच्या राजकारणात महविकास आघाडीत रुचत नसल्याने  शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदेंनी एक नवा अध्याय रचला होता. ज्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पद देऊन भाजपने नवी खेळी केली होती. मात्र, आता निकालानंतर सगळी समीकरणं बदलून गेली आहेत. अशावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडून दिला आहे. तसेच मोदी-शाह जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असंही ते यावेळी पत्रकार परिषदेत म्हणाले.
Maharashtra New Chief Minister
दरम्यान, अमित शाह हे उद्या महायुतीच्या तीनही नेत्यांसोबत बैठक करणार असून त्यानंतर मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय हा जाहीर केला जाईल.असेही शिंदे यांनी सांगितले.
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला?
Maharashtra New Chief Minister
लोकांची भावना साहजिक आहे.. मला मुख्यमंत्री करण्याचे.. हा त्यांचा मोठेपणा आहे. मी जे निर्णय घेतले ते त्यांना माहिती आहे.आम्ही महायुतीचे लोकं आहोत. आम्हाला त्यांनी अडीच वर्ष पाठिंबा दिला होता ना.. आता भाजपचे वरिष्ठ जो निर्णय घेतील त्याला आणि त्यांच्या उमेदवाराला आमचा पूर्ण पाठिंबा असेल, असंही मोठं विधान शिंदेंनी केलं असून या विधानातूनच त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचे सूचित केले आहे.
Maharashtra New Chief Minister
मी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानतो. हा अतिशय मोठा विजय आहे. त्यामुळे जे काही अडीच वर्षात महायुतीने काम केलंय आणि महायुतीवर जो विश्वास दाखवला आहे.त्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले व पुढे बोलतांना म्हणाले की एकीकडे विकासकामं आम्ही पुढे नेली. अनेक प्रकल्प सुरू झाली. तसंच  विकासकामं आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली. आम्ही महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केलं. मी पहाटेपर्यंत काम करायचो. दोन-तीन तास झोपायचो नंतर पुन्हा सभा घ्यायचो. मी 80-90 सभा महाराष्ट्रात घेतल्या. मी कार्यकर्ता म्हणून काम केलं. करत राहीन, असंही शिंदे म्हणाले.
Maharashtra New Chief Minister
 शिंदे पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले, मला आठवतंय की, आम्ही उठाव केला तेव्हा नरेंद्र मोदी-अमिल शाह यांचा मोठा पाठिंबा लाभला. मी आपल्याला सांगू इच्छितो.. की, आम्ही घेतलेले निर्णय ऐतिहासिक आहेत. आतपर्यंत आम्ही घेतलेले निर्णय कोणत्याही सरकारने घेतलेले नव्हते. त्यामुळे आज मी पाहतोय की, राज्याचा प्रंचड असा वेग आहे. राज्य एक नंबरला नेण्याचं काम आम्ही केलंय. या निवडणुकीत जो मतांचा वर्षाव झाला तो केवळ आम्ही काम केलं, निर्णय घेतले जी सकारत्मकता दाखवली त्यामुळे मतांचा वर्षाव झाला.मी जनतेसाठी एक निश्चिय केला होता की, कॉमन मॅनसाठी काही तरी केलं पाहिजे.
Maharashtra New Chief Minister
सर्व सामान्य कुटुंबाच्या वेदना मी पाहिल्या आहे.हे सगळं माझ्या डोक्यात होतं. तेव्हा मी ठरवलं की, माझ्याकडे जेव्हा असा अधिकार येईल तेव्हा लाडकी बहीण असेल, लाडके भाऊ असेल.. त्यांच्यासाठी काही करेल. त्यामुळे लाडक्या बहिणींचा मी लाडका भाऊ झालो.आम्ही डोंगराप्रमाणे तुमच्या मागे उभे राहू. त्यांनी मुख्यमंत्री केलं त्यानंतर प्रत्येक दिवस त्यांनी आम्हाला खंबीरपणे मदत केली. आम्ही नाराज होऊन रडणारे नाही लढणारे आहोत.. एवढा मोठा विजय झाला.
Maharashtra New Chief Minister
 आजपर्यंतचा हा ऐतिहासिक विजय झाला. जीव तोडून आम्ही काम केलं, निर्णय घेतले. “जे काही आता सगळं या राज्यामध्ये एवढं बहुमत आलं. मग कुठे घोडं आडलं, पण कुठेही घोडं वैगरे आडलेलं नाही. मी अगदी मोकळ्या मनाचा माणूस आहे. मी कुठेही धरून ठेवलं, ताणून ठेवलं.. अशातला माणूस नाही. मी सांगितलं, माझ्या सगळ्या पदांपेक्षा सख्खा लाडका भाऊ हे पद आहे. नवीन ओळख जी आहे ती नशीबाने मिळते, असंही शिंदे म्हणाले.
     Maharashtra New Chief Minister
Tags: Latest Marathi NewsMaharashtra New Chief Minister: एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडलाMuktai varta newsपरंतु नरेंद्र मोदी-अमित शाह पुन्हा वापरणार धक्कातंत्र?
Previous Post

रोहिणी खडसेंना धक्का ! प्रचारात अग्रस्थानी  असलेल्या तेली समाजातील युवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश !

Next Post

आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 728 वा संजीवन समाधी सोहळा साजरा; संत मुक्ताबाईंच्या पादुकांचे परंपरेनुसार स्वागत ! 

Admin

Admin

Next Post
आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 728 वा संजीवन समाधी सोहळा साजरा; संत मुक्ताबाईंच्या पादुकांचे परंपरेनुसार स्वागत ! 

आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 728 वा संजीवन समाधी सोहळा साजरा; संत मुक्ताबाईंच्या पादुकांचे परंपरेनुसार स्वागत ! 

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group