Magh Purnima 2023: हिंदू धर्मात पौर्णिमेला (Magh Purnima) विशेष महत्त्व आहे. त्यानुसार माघ महिन्याची पौर्णिमा (Magh Purnima Date) शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2023 रोजी येत आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला माघ पौर्णिमा म्हणतात. याला माघी पौर्णिमा असेही म्हणतो. माघी पौर्णिमेच्या दिवशी गंगा नदीत स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी गंगा नदित स्नान केल्याने अक्षय पुण्य लाभतं. चला तर मग जाणून घेवूया माघ पौर्णिमाचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी (Magh Purnima Shubh Muhurt).
असे आहे माघ पौर्णिमेचे महत्त्व
पंचांगानुसार, प्रत्येक महीन्यात पौर्णिमा येते. प्रत्येक पौर्णिमेचे आपले वेगळे महत्त्व आहे. त्यानुसार माघ पौर्णिमेही महत्त्वाची आहे. माघ नक्षत्र या नावावरून माघ पौर्णिमेची उत्पत्ती झाली आहे. धार्मिक मान्यतेनुसार, माघ महिन्यात सर्व देवता पृथ्वीवर येतात आणि मानवरूप धारण करतात आणि प्रयागमध्ये स्नान, दान आणि जप करतात. त्यामुळे या महिन्याचे मोठे माहात्म्य आहे. असे म्हणतात की, या दिवशी प्रयाग किंवा गंगा नदीत स्नान केल्यास व्याक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. यासोबतच मोक्षही प्राप्त होतो. माघ पौर्णिमेच्या दिवशी पुष्य नक्षत्र असेल तर या तिथीचे महत्त्व अधिक पटीने वाढते.
माघ पौर्णिमा व्रत मुहूर्त
माघ पौर्णिमा 4 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 9:21 वाजता सुरू होईल.
तर 6 फेब्रुवारी 2023 रोजी 00:01 वाजता पौर्णिमा समाप्त होईल.
असे करा व्रत आणि पूजा
जीवनात सुख समृद्धीसाठी माघ पौर्णिमेचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान, दान, हवन, व्रत आणि जप करण्याचा नियम आहे. त्यानुसार, माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून गंगा किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करावे. स्नानाच्या वेळी सूर्यदेवाचा मंत्र जपून सूर्याला अर्घ्य द्यावे. स्ननानंतर व्रताचा संकल्प करत दिवसभर उपवास ठेवा. तसेच या दिवशी भगवान मधुसूदनची पूजा करावी. यासह असहाय्य लोकांना अन्नदान करावे. दान करणाऱ्या वस्तूंमध्ये तीळ आणि काळे तीळचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे.
(टीप – हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. muktaivarta.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)