Lucky Zodiac Signs: हिंदू धर्मात शनिदेवाला (Shani Dev) न्याय देवता मानले जाते. शनिदेव प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. शनिदेव चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीला चांगले फळ तर वाईट कर्म करणाऱ्यांना दंड देखील देतात. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात शनिदेवाची साडेसाती आणि महादशेचा सामना करावा लागतो. शनीच्या साडेसाती (Sadesati Upay) आणि महादशेच्या काळात व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, अशा काही राशी आहेत ज्याच्यावर शनिच्या साडेसातचा प्रभाव पडत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार (Jyotish Tips), शनिदेवाच्या काही आवडत्या राशी आहेत, ज्यावर शनिदेवाची कायम कृपा राहते. जाणून घेवूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.
- वृषभ – वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीवर शनिदेवाची कायम कृपा राहते. शनि आणि शुक्र यांच्यातील मैत्रीच्या भावनेमुळे वृषभ राशीच्या लोकांवर शनीचा अशुभ प्रभाव पडत नाही. त्यामुळे साडेसातीत देखील या राशीच्या लोकांना त्रास होत नाही.
- तूळ – तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीमध्ये शनिदेव उच्च राशीचे मानले जातात. त्यामुळे या राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसाती आणि महादशेचा प्रभाव खूपच कमी असतो. शनिदेवाच्या असीम कृपेने या राशीच्या लोकांना प्रगती होते.
- मकर – मकर राशीचे स्वामी स्वत: शनिदेव आहे. मकर ही शनिदेवाच्या आवडत्या राशींपैकी एक मानली जाते. या राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसाती आणि महादशेचा प्रभाव कमी असतो.
- कुंभ – कुंभ राशीचा स्वामी देखल शनिदेव आहे. या राशीच्या लोकांवर शनिदेवाचा कायम शुभ प्रभाव असतो. या राशीच्या लोकांना क्वचितच आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. यासोबतच शनिदेव या राशीच्या लोकांचे शारीरिक आणि मानसिक तणावही कमी करतात.
(टीप – हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. muktaivarta.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)