सोलापूर, 3 मार्च (हिं.स.): हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आज हिंदू धर्मावर होणारे आघात वाढत आहेत. हिंदूंना धर्मशिक्षित करणे आणि धर्मरक्षणासाठी सिद्ध करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन कालीपुत्र कालिचरण महाराज यांनी केले. ओम काली हिंदवी स्वराज्य सेनच्या सोलापूर शाखेच्या वतीने हिंदू धर्माच्या कार्यात
सदैव तत्पर असणाऱ्या धर्माभिमान्यांना त्यांच्या विशेष कार्याबद्दल ‘धर्मरक्षक’ पुरस्कार शिवस्मारक सभागृहात आयोजित कार्यक्रमात देण्यात आला. हा पुरस्कार कालीपुत्र कालिचरण महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुढे ते म्हणाले, जात पात की करो विदाई हम सब हिंदू भाई भाई. संघटन वाद मिटवत सर्वानी भगव्या धर्मध्वजाखाली एकत्र यावे, असे ते म्हणाले.