जळगाव, 8 मार्च (हिं.स.) चुंचाळे ता. यावल जवळ असलेले गायरान या ठिकाणाहून ते संपुर्ण खान्देशात आदिवासी बांधवाना अतिशय आनंद देणारा आवडणारा सण म्हणजे भोंगऱ्या हा होय. वर्षभर काबाड कष्ट करुण भोंगऱ्या सणानिमित्त जळगाव, धुळे, नंदुरबार, ह्या तीन जिल्हयातील आदिवासी बांधव एकत्र या सणानिमित्त येत असतात,वाडया- वस्त्यांवर तरुण -तरुणीसह आबाद वृध्द ढोल ताशांच्या तालावर ब बासरी च्या सुरांनी धुंद होऊन ‘ भोगऱ्या आया रेभाया, चालु ,चालू रे भोंगऱ्या देखांन चालु,
अशी लोकगीते सादर करतात, आणी भोंगऱ्या सणाचा मनमुराद आनंद लुटतात. आदिवासी पावरा बांधवाना सर्वांत आवडता व मन उत्साहात करणारा सण म्हणजे भोंगऱ्या दिवाळीला जेवढे महत्व असते, तेवढेच आदिवासी बांधवामध्ये भोंगऱ्या सणास महत्व असते. हा सण उत्साहात साजरा करण्यासाठी, पाड्या, वस्त्यावर स्थानिक रहिवाश्यासह बाहेरगावी रहात असलेले पावरा बांधव एकत्र येतात व हा सण जल्लोषात साजरा करतात. यंदाही मोठया प्रमाणात पावरा बांधव कुंडया पाणी , धानोरा, अडावद, किनगाव,चुंचाळे (गायरान ),यावल येथे एकत्र येणार असुन भोंगऱ्याचा आनंदोत्सव साजरा करणार असुन त्यामुळे वैभवशाली सातपुड्याला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.