जळगाव, 20 मार्च (हिं.स.) एरंडोल विधानसभा निवडणुकीतील पराभूत अपक्ष उमेदवार भगवान आसाराम महाजन, माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, राजेंद्र चौधरी, किशोर निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप रोकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख पराग पवार, शिंदे गटाचे उपशहरप्रमुख आनंदा चौधरी, विकी खोकरे अशा जवळपास १५० पदाधिकाऱ्यांनी येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, भाजपाचे महामंत्री विजय चौधरी, नामदार गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश घेतला.
प्रवेश घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये उबाठा शिवसेना गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संख्या सर्वाधिक आहे. यावेळी भाजपाचे एरंडोल तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष एस. आर. पाटील, भाजपाचे जिल्हा चिटणीस निलेश परदेशी, युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस पिंटू राजपूत, अमर राजपूत, भाजपाचे शहराध्यक्ष सुनील महाजन हे पदाधिकारी उपस्थित होते.