जागतिक महिला दिन ! हा दिवस म्हणजे स्त्री शक्तीचा गौरव करण्याचा, तिच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा दिवस आहे. अनादी काळापासून स्त्रीने आपल्या कर्तृत्वाने, त्यागाने आणि प्रेमाने जगाला नवी दिशा दिली आहे. आज आपण राजमाता जिजाऊ, कल्पना चावला, मदर टेरेसा, सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या कर्तृत्वान महिलांचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. त्यांनी आपल्या कार्यांनी समाजात मोलाचे योगदान दिले आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.
महिला म्हणजे केवळ शक्ती नाही, तर ती करुणा आणि प्रेमाचा झरा आहे. आजच्या काळात महिलांनी आपल्या हक्कांसाठी आणि सन्मानासाठी लढत आहे. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन’ महिलांच्या शक्तीच्या कार्याचा जागर करण्यासाठी हा दिवस असतो. हा दिवस लिंग समानता, हक्क आणि महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या मुद्यांवर लक्ष केंद्रित करतो. महिलांचा हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून हा दिवस पाळला जातो. या दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार केला जातो. त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. महिला वर्गाला त्यांच्या स्वातंत्र्याची जाणीव होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
स्त्री म्हणजे वासल्य,
स्त्री म्हणजे मांगल्य,
स्त्री म्हणजे मातृत्व,
स्त्री म्हणजे कतृत्व,
स्री म्हणजे प्रत्येक क्षणाची साथ,
स्री म्हणजे प्रत्येक अडथळ्यावर मात करणारी माता…..।
“महिला अनेक क्षेत्रात प्रगती करत आहेत. अगदी कृषी क्षेत्रापासून अंतराळ क्षेत्रापर्यंत महिला आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहेत, पण दुसरीकडे ग्रामीण भागात आणि निमशहरी भागातील महिलांना रोज अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. अशा परिस्थितीत महिलांचे सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी राज्य शासनामार्फत अनेक योजना राबवल्या जात आहेत. मुलींच्या जन्मापासून ते शिक्षण आणि विवाहानंतरही अनेक योजनांचा लाभ घेता येतो. दरवर्षी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. या महिला दिनानिमित्त आपण केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या वतीने खास महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांविषयी जाणून घेणार आहे.
महिलांसाठी शासकीय योजना अशा आहेत:–महिला समृद्धी योजना, महिला उद्योग निधी योजना, महिला कॉयर योजना, जननी सुरक्षा योजना, सुकन्या समृद्धी योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, लेक लाडकी योजना, स्वर्णिमा योजना, महिला सन्मान योजना इ.योजना शासनाकडून महिलांसाठी राबविण्यात येत असून महिलांचे सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी राज्य शासनामार्फत अनेक योजना राबवल्या जात आहेत.
मुलींच्या जन्मापासून ते शिक्षण आणि विवाहानंतरही अनेक योजनांचा लाभ घेता येतो. “बेटी बचाओ, बेटी पढाओ” स्रीभ्रुण हत्या रोखण्यासाठी पीसीपीएनडीटी अँक्ट तयार लागू करण्यात आला आहे. स्रीचे कुठेही सामाजिक शोषण होऊ नये यासाठी हा केंद्र बिंदू मानून संरक्षण करण्यात येते.
दरवर्षी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. या महिला दिनानिमित्त आपण केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या वतीने खास महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांविषयी जनजागृतीपर व्याख्यान, उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येतो. सध्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना शासनातर्फे राबविण्यात येत आहे. त्याला सर्वत्र गरजू महिलांचा प्रतिसाद मिळत आहे. भारतासारख्या प्रगतीशील देशात महिलांनी राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, प्रधानमंत्री, अर्थमंत्री, मुख्यमंत्री तसेच शासकीय स्तरांवर,वैद्यकीय, विधी, संशोधन इ. आदी क्षेत्रात महत्त्वाची पदे भूषविली असून कार्यरत आहेत. 30 टक्के नोकरीत ठिकाणी आरक्षण देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला आहे.
प्रत्येक मानवाने स्रीच्या पोटी जन्म घेतला असून स्रीच्या आर्थिक सामाजिक, शैक्षणिक, इ. शोषण कुठेही होऊ नये यासाठी शासनाने संरक्षणासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. यासाठी समाजाच्याही तेवढाच पाठिंब्याची गरज आहे. समाजात प्रत्येक स्री आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत आहे. परिवाराच्या जबाबदारीचा हिस्सा बनू पाहात आहे. स्री ही आई ,बहिण ,पत्नी, मुलगी इ.असून सर्वच क्षेत्रात प्रगती करत आहे. पण आजही देशात शासकीय आकडेवारी नुसार माणसांच्या तुलनेने स्रीचे प्रमाण कमी आहे यासाठी “स्री संरक्षण” ही आपली सर्वाची सामाजिक जबाबदारी याचे पालन सर्वोतोपरी व्हावे, जेणेकरून स्री च्या संरक्षणात आपण कुठेही कमी पडणार नाही, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. महिला म्हणजे केवळ शक्ती नाही, तर ती करुणा आणि प्रेमाचा झरा आहे.
आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे आर्थिक सामाजिक शोषण कुठेही होऊ नये, स्वबळावर , स्वसंरक्षणासाठी सक्षम होण्यासाठी समाजानेही पाठिंबा द्यावा, एवढीच अपेक्षा.
लेखन संकलन
हेमकांत सोनार, जिल्हा माहिती कार्यालय
रायगड-अलिबाग.