Skin Care Tips: प्रत्येक ऋतुचे आरोग्याला फायदे आणि तोटे असतात. त्यानुसार हिवाळा (Winter) हा आरोग्यदायी ऋतू असला तरी या ऋतूत आरोग्यविषयी काही समस्या देखील निर्माण होतात. यात त्वचेशी निगडाची समस्या (Skin Problem) विशेषतः जाणवते. हिवाळ्यात त्वचा फाटने ही एक सामान्य समस्या आहे. साबण आणि पाणी जास्त वापरल्याने त्वचा फाटते. मात्र, तुम्हाला माहित आहे का व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे (Vitamin Deficiency) देखील त्वचा फाटण्याची समस्या निर्माण होते. शरीराच्या सर्वांगीण विकासासह हेल्थी स्कीनसाठी व्हिटॅमिन महत्त्वाचे असते. या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही व्हिटॅमिन्स बद्दल माहिती सांगणार आहोत ज्याचा आहारात समावेश केल्याने हिवाळ्यात त्वचा फाटण्याच्या समस्येत आराम मिळतो.
या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे फाटते त्वचा
हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंगच्या मते, शरीरात व्हिटॅमिनची कमतरता. शरीरात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 1 (थायामिन), व्हिटॅमिन बी 2 (रिबोफ्लेविन) आणि व्हिटॅमिन बी 3 (नियासिन) सारख्या आवश्यक जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे त्वचा फाटण्याची समस्या निर्माण होते. त्यानुसार जाणून घेऊया या व्हिटॅमिनची कमतरता कशी पूर्ण करता येईल याविषयी अधिक माहिती.
व्हिटॅमिन ए
त्वचेच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ए महत्वाचे ठरते. या व्हिटामिनच्या कमतरतेमुळे त्वचा खूप कोरडी होते. याशिवाय त्त्ववचा फाटत त्वचेला खाज सुटण्याची समस्या देखील निर्माण होते. शरीरात व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे एक्जिमा देखील होऊ शकतो, ज्यामुळे त्वचेवर जळजळ, खवलेले ठिपके, फोड आदी समस्या निर्माण होते. शरीरात व्हिटॅमिन एची पूर्तता करण्यासाठी आहारात गाजर, अंडी, पिवळ्या किंवा केशरी भाज्या, रताळे, पालक आदीचा समावेश करावा.
व्हिटॅमिन ई
व्हिटॅमिन ई आपल्या शरीरात कोलेजनच्या उत्पादनास प्रोत्साहन देते, जे आपल्या त्वचेचे संरक्षण करते. शरीरात व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे त्वचा खूप कोरडी होते. अशा स्थितीत शरीरात व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे त्वचेला भेगा पडू लागतात. शरीरातील व्हिटॅमिन ईची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात एवोकॅडो, शेंगदाणे, आणि स्निग्ध पदार्थाने युक्त बियांचे सेवन करा.
व्हिटॅमिन डी
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन डी फायदेशीर ठरते. शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता झाल्यास त्याचा परिणाम रोगप्रतिकार शक्तीवर होतो. ज्यामुळे एक्जिमा आणि त्वचेच्या पेशींशी संबंधित समस्या निर्माण होते. शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी काही वेळ उन्हात बसावे. यासह सूर्यफुलाच्या बिया, दुग्धजन्य पदार्थ, एवोकॅडो इत्यादींचे सेवन केले पाहिजे.
(टीप : हा लेख सामान्य माहितीवर आधारीत आहे. कोणताही उपाय करून पाहण्याआधी वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा)