Muktainagar News: संत मुक्ताईनगर येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे हिंदुहृदयसम्राट, शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे (Balasaheb thackeay) यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandakant Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
शहरातील प्रवर्तन चौकात दि.२३ जानेवारी २०२३ सकाळी ९ वा.पार पडलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी तालुका प्रमुख छोटू भोई, माजी तालुका प्रमुख प्रमोद देशमुख , उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, शहर प्रमुख गणेश टोंगे, राजेंद्र हिवराळे, शहर संघटक वसंत भलभले, नगरसेवक संतोष कोळी, पियूष मोरे, संतोष मराठे, युनूस खान, गोपाळ सोनवणे,शिवराज पाटील, अशोक चौधरी आदींची उपस्थिती होती.
आरोग्य शिबीर
संत मुक्ताईनगर येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य महाआरोग्य शिबीर आ.चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी रित्या संपन्न झाले. शिबिरात डोळे तपासणी, मोती बिंदू, मोतीबिंदू शस्त्रक्रिया तपासणी, तिरळेपणा शस्त्रक्रिया तपासणी, 2D Echo.E.C.G, कार्डीओग्राफ, रक्तदाब तपासणी, मुतखडा, मूत्र पिंडातील खडे, प्रोस्टेट,पित्ताशय खडा आदी तपासणी, नाक कान घसा, स्त्री रोग विभाग तसेच इतर असंख्य आजरावरील तपासणी या शिबिरात करण्यात आल्या हजारो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.