मालेगाव, 26 मार्च (हिं.स.) : विभागीय आयुक्त असल्याचे बनावट नियुक्तीपत्र दाखवून लवकरच नाशिक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त होणार असल्याची बतावणी करून शासकीय जमिनीवर कमी किमतीत रो हाऊस बांधून देण्याचा बनाव करणारा तोतया पोलिसांनी जेरबंद केला आहे. रिंकात नरेश रजक ऊर्फ अब्दुल रहेमान (वय ३७. रा. नाहर बाली, माता रोड, ग्वालियर) असे याचं नाव आहे. त्याने शासकीय जमिनीवर घर बांधून देण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केली. साडे आठ लाख रुपयाची फसवणूक करणाऱ्या अब्दुल रहेमान विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी त्यात्य अटक केली असून न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकाराने येथे खळबळ उडाली आहे. रिकल नरेश रजक ऊर्फ अब्दुल रहेमान गेल्या चार महिन्यापासून मुस्लीम पेहरावात वावरत होता. येथील जाफरनगर भागात पोलिसांची जमीन आहे. ती जागा शास्स्नाकडून ९९ वर्षाच्या करारावर घेणार आहे. त्या जागेवर मोठी कॉलनी बांधली जाणार आहे. या जागेवर रो हाऊस बांधून १ लाख २० हजार रुपये प्रति रो हाऊस एवढ्या कमी किमतीत दिले जाणार असल्याचे त्याने अशिक्षित नागरीकांना सांगितले.
अन्सारी मोहम्मद फैजान मोहम्मद जलाल (३६, रा. नया इस्लामपुरा) यांनी १ लाख २० हजार रुपये तसेच त्यांच्या ओळखीच्या अन्य नागरिकांकडून ७ लाख ३० हजार रुपये असे एकूण ८ लाख ५० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अन्सारी मोहम्मद फैजान यांनी पोलिसात तक्रार दाखल केली .शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अब्दुल रहमानला अटक केली . रिंकल नरेश ऊर्फ अब्दुलने शहरात किती अशिक्षित नागरीकांना फसवणूक केली आहे याचा तपास पोलिस करणार आहे न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.