अमरावती, 15 मार्च (हिं.स.)
स्थानिक महादेव खोरी परिसरात, श्री संत सद्गुरू विदेही मोतीराम महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व श्री संत सद्गुरू वसंत बाबा यांच्या मार्गदर्शनात गेल्या 25 वर्ष सातत्याने सुरु असलेल्या “धुलिवंदनाच्या दिवशीची सत्संगाची दिंडी शोभयात्रा ” परंपरे प्रमाणे उत्साहाने पार पडली.
या सत्संगाच्या दिंडी शोभयात्रेत महादेवखोरी, मंगलधाम, यशोदा नगर भागातील हजारो नागरिकांनी भाग घेतला.महादेव खोरी परिसरात फिरताना भक्तांनी टाळ मूदूंगच्या तालावर ताल धरला,भजन करीत,सर्वांनी सत्संगाच्या मार्गाने वाटचाल केली.दिंडीच्या मार्गात भक्तांसाठी किरणताई गुप्ता यांनी शरबत वाटप केले.या कार्यक्रमाची सांगता, संत नगरी शेगाव येथील श्री संत धुमाळ बाबाजी यांच्या काल्याचा कीर्तनाने झाली, कीर्तनात होळीच्या आनंदात,नशामुक्ती आणि ईश्वर भक्तीच्या रंगाची उधळण याचे महत्व सांगण्यात आले.आणि भक्तांना महाप्रसादचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी महादेव खोरी येथील किरण गुप्ता,विजय टांगले, राजू भुरले,रेखा शेंडे,कांता टेकाम तसेच भाजपचे पदाधिकारी राजेश आखेगावकर, गजानन देशमुख, लखन राज, विष्णुपंत गवळी, संजय तायडे सहभागी झाले होते