पुणे, 5 एप्रिल (हिं.स.)।
पुण्यातील सिम्बायोसिस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयात आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त रविवारी सकाळी साडेनऊ वाजता वारसा दर्शन कार्यक्रम होईल. सिम्बायोसिस संस्थेने निर्माण केलेल्या या जागतिक दर्जाच्या संग्रहालयात डॉ. आंबेडकर यांच्या वापरातील अनेक वस्तू , कपडे, टेबल-खुर्ची, भांडी, पुरस्कार व त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला पलंग नागरिकांना पाहायला मिळणार आहे .
तसेच त्यांच्या दैदीप्यमान वाटचालीतील महत्त्वाची छायाचित्रे पाहायला मिळतील. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डॉक्टर आंबेडकर स्वतः आपल्याला प्रश्नांची उत्तरे देणार असल्याचा अनुभव घेता येणार आहे . तरी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.