हरताळे येथे दि.१२ रोजी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पालखी सोहळ्याचे आयोजन
मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे येथे महानुभव पंथाच्या श्रद्धेचे स्थळ असून येथे जळगाव , मध्यप्रदेश तसेच विदर्भ व अनेक जिल्ह्यातून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या दर्शनासाठी येऊन दंडवत घालत असतात.
याच अनुषंगाने दरवर्षी प्रमाणे यंदाही दि.१२ मार्च २०२५ रोजी बुधवारी दुपारी ४ वाजता मंदिर समितीच्या वतीने भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन केलेले असून या पालखी सोहळ्यात भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समस्त (पंजाबी) पुजारी परिवार व हरताळे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.