अहिल्यानगर दि. 31 मार्च (हिं.स.)- सामाजिक क्षेत्रात योगदान देवून आरोग्य व पर्यावरण चळवळ चालविणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने स्थापना दिनाची रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक कार्याची गुढी उभारली. वाढत्या उन्हाळ्यात पक्ष्यांचे जगणे सुसह्य व्हावे म्हणून भिंगार येथील भगवान गौतम बुध्द जॉगिंग पार्क मधील वृक्षांवर प्लास्टिकचे भांडे अडकवून पक्ष्यांसाठी धान्य व पाण्याची सोय करण्यात आली. मराठी नववर्षाची सुरुवात महिलांच्या हस्ते गुढी उभारुन वृक्षारोपण मोहिम राबविण्यात आली.तर यावेळी स्वच्छता अभियान देखील राबविण्यात आले.
हरदिन मॉर्निंग ग्रुपला 25 वर्ष पूर्ण होवून रौप्य महोत्सवी वर्षाची सुरुवात ग्रुपच्या सदस्यांनी सामाजिक उपक्रमांनी सुरुवात केली. तर आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक चळवळ चालविताना वर्षभर ग्रुपच्या माध्यमातून सातत्याने कार्य सुरु आहे. प्रारंभी जॉगिंग पार्क मधील भगवान गौतम बुध्द यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन योगा, प्राणायामने पहाटेची सुरुवात झाली. जॉगिंग पार्कच्या हिरवळीवर नागरिकांनी योग, प्राणायाम केला.भारती कटारिया, सुरेखा आमले-शिवगुंडे, प्रांजली सपकाळ, उषा ठोकळ, संगीता सपकाळ, मीरा मुळे, डॉ. सीता भिंगारदिवे, आशाताई पराते,अदिती मेहेत्रे, सुनीता चव्हाण,सुवर्णा महागडे-भिंगारदिवे, चंद्रकला रासणे,भाग्यश्री मुनोत,कांता बाई स्वामी या महिलांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली.
तर उद्यान परिसरात महिलांनी विविध प्रकारच्या रोपांची लागवड केली.दिवसं-दिवस उन्हाची तीव्रता वाढत असताना अधिकाधिक तापमानाची नोंद होत आहे. पक्षी पाण्यासाठी व अन्नासाठी भटकंती करीत आहे. वाढत्या तापमानात पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने अनेक पक्ष्यांना जीव गमवावा लागत आहे. ही जाणीव ठेऊन ग्रुपच्या सदस्यांनी उन्हाळ्यात वाढत्या तापमानात पक्ष्यांना वाचविण्यासाठी झाडाला धान्य व पाण्याची भांडी टांगण्यात आली. ग्रुपच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नागरिकांना मिठाईचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सीए रविंद्र कटारिया, सीए श्रेयांश कटारिया, रमेश वराडे, संतोष ताठे, रतनशेठ मेहेत्रे, सर्वेश सपकाळ, मेजर दिलीपराव ठोकळ, सचिन चोपडा, जहीर सय्यद, अभिजीत सपकाळ, दीपकराव धाडगे, मनोहर दरवडे, सुधीर कपाळे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे, अशोक पराते, ईवान सपकाळ,
दीपक घोडके, महेश सरोदे,दिलीप गुगळे, विकास भिंगारदिवे, सरदारसिंग परदेशी, प्रकाश देवळालीकर, अविनाश जाधव, सुभाष पेंढुरकर, विठ्ठल (नाना) राहिंज, अनिलराव सोळसे, मुन्ना वाघस्कर, राजू कांबळे, सूर्यकांत कटोरे, सुधाकर झांबरे, शेषराव पालवे, विलास आहेर, कन्हैय्या परदेशी, सुंदरराव पाटील, कुमार धतुरे, बंडू बेद्रे, नामदेवराव जावळे, रामनाथ गर्जे, सिताराम परदेशी, अतुल मुनोत, राजू शेख, प्रशांत चोपडा, शिवांश शिंदे, विशाल भामरे, अनिल हळगावकर, योगेश चौधरी, संजय शिंगवी आदी उपस्थित होते.संजय सपकाळ म्हणाले की, हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने वर्षभर योग, प्राणायामच्या माध्यमा तून आरोग्य चळवळ व वृक्षारोपण संवर्धन करुन पर्यावरण संवर्धन चळवळ चालवली जाते. तसेच विविध सामाजिक उपक्रमातून गरजूंना आधार देण्याचे काम केले जात आहे. मोफत आरोग्य, नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेवून आणि समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरवून आधार दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.