मुक्ताईनगर येथे महिला दिनी “भव्य महिला मेळावा”
आ.चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत ४.६६ कोटी रु.चे कर्ज वाटप
‘उत्कृष्ट उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बचत गटांना,महिलांना, महिला बचत गटामध्ये व्यवसाय करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांना, जागतिक महिला दिनानिमित्त मुक्ताईनगर येथे उमेद तर्फे आयोजित “भव्य महिला मेळावा” कार्यक्रमात आ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच ४.६६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. यावेळी आ.चंद्रकांत पाटील उपस्थित बचत गटाच्या महिला माता-भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
‘तसेच सदर मेळाव्यामध्ये बचत गटातील (१०३ बचत गट) महिलांना आर्थिक सहाय्य ४ कोटी ६६ लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले.व उमेद मध्ये वार्षिक कार्यकाळात उत्कृष्ट पद्धतीची कामगिरी केल्याबद्दल महिलांचा सत्कार करण्यात आला.
‘जीवनात प्रत्येक टप्प्यावर विविध भूमिकेत आपले जगणे समृद्ध करणार्या स्त्री-शक्तीचा हा दिवस.संधी मिळाली तर,महिला काय करु शकतात,हे जगानं वेळोवेळी पाहिलं आहे. म्हणूनच त्या सक्षम होणं आवश्यक आहे. महिला सक्षम झाल्या तरच खऱ्या अर्थाने समानतेचं पर्व सुरु होईल.
‘याप्रसंगी अनंतराव देशमुख,दिनेश कदम,महेंद्र मोंढाळे,गटविकास अधिकारी निशा जाधव मॅडम, जिल्हा व्यवस्थापक उमेद श्री.हरेश्वर भोई सर, डॉ.चंद्रकांत सोनवणे, श्री.राहुल ठोसरे, सेंट्रल बँक मॅनेजर श्री.गोपाळ पाटील, सेंट्रल बँक मॅनेजर श्री.कुणाल राजपूत, श्री.रविंद्रजी एचडीएफसी बँक रावेर, श्री.उमेश बडगुजर,पवन सुरवडकर तसेच बचत गटातील कर्मचारी वर्ग,विविध बचत गटातील महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#internationalwomensday #Muktainagar #बचत_गट #महिला_दिन